Khushi Kapoor : 'द आर्चीज' रिलीज होताच खुशी कपूरला मिळाला दुसरा सिनेमा; 'या' स्टारकिडसोबत स्क्रीन शेअर करणार
Khushi Kapoor : 'द आर्चीज' (The Archies) या सिनेमानंतर खुशी कपूर लवकरच एका सिनेमात झळकणार आहे. करण जोहर (Karan Johar) या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.
Khushi Kapoor And Ibrahim Ali Khan Movie : सिनेनिर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांची लेक खुशी कपूरने (Khushi Kapoor) दिग्दर्शक जोया अख्तर (Zoya Akhtar) यांच्या 'द आर्चीज' (The Archies) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 'द आर्जीज' या सिनेमानंतर खुशी कपूर लवकरच एका सिनेमात झळकणार आहे. करण जोहर (Karan Johar) या सिनेमाची निर्मिती करणार आहे.
'या' स्टारकिडसोबत झळकणार खुशी कपूर
खुशी कपूरने 'द आर्चीज' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 7 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. पहिला सिनेमा रिलीज झाल्या झाल्या खुशीला आता दुसरा सिनेमाही मिळाला आहे. करण जोहर या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळणार आहे. या सिनेमात सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलगा इब्राहिम अली खानसोबत (Ibrahim Ali Khan) स्क्रीन शेअर करताना खुशी दिसेल.
View this post on Instagram
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, करण जोहर एक रोमँटिक सिनेमा बनवण्याची तयारी करत आहेत. या सिनेमात खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान मुख्य भूमिकेत झळकतील. खुशी-इब्राहिमचा हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. या सिनेमाच्या स्ट्रीमिंग राइटसाठी निर्माते ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत बोलत आहेत. खुशी कपूर आणि इब्राहिम अली खानच्या या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा शौना गौतम सांभाळणार आहे. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. अद्याप सिनेमाचं नाव समोर आलेलं नाही.
इब्राहिम अली खानचं बॉलिवूडमध्ये पदार्पण
शौना गौतमने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) आणि 'संजू' (Sanju) या सिनेमांचं सहाय्यक दिग्दर्शन केलं आहे. तर खुशी कपूरने 'द आर्चीज' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. इब्राहिम अली खान 'सरजमीं' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत या सिनेमाची निर्मिती होणार आहे. खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान यांचा हा दुसरा सिनेमा आहे. आता खुशी आणि इब्राहिमच्या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या