Movie Shooting : छोटा पॅकेट बडा धमाका; गंभीर दुखापत होऊनही शूटिंगदरम्यान 'या' बालकलाकाराने केली कमाल
Aryan Hagawane : गंभीर दुखापत होऊनही सीनदरम्यान 'खुर्ची' फेम आर्यन हगवणेने कमाल केली आहे.
Khurchi Movie Shooting : 'खुर्ची' (Khurchi) हा बहुचर्चित मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत होऊनही बालकलाकार आर्यन हगवणे (Aryan Hagawane) याने कमाल केली आहे.
बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करून असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अथक प्रयत्न करून यशाचं शिखर गाठलं आहे. बालकलाकार म्हणून सुरू असलेला त्यांचा प्रवास ही लहान बच्चे कंपनी अगदी आनंदाने करत असतात. अभ्यास सांभाळून ही लहान मंडळी अभिनयाची आवड जोपासत पुढे येतात.
'खुर्ची' या आगामी अॅक्शनपटात अशाच एका लहानग्याने साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरतेय. बालकलाकार म्हणून आर्यन हगवणे याने त्याचा प्रवास सुरु केला आहे. या चित्रपटात आर्यन हगवणे मुख्य भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी लहान वयात आर्यनने चित्रपटातील भूमिका उत्तमरीत्या पार पाडली आहे. चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान एका सीनवेळी घडलेल्या प्रसंगाने अक्षरशः अंगावर काटे येत आहेत.
तो सीन, तो रक्तस्त्राव, गंभीर दुखापत अन्...
आर्यनची चित्रपटात क्रूर, रागीट व धाडसी भूमिका आहे. यामुळे बरेचदा त्याचे ऍक्शन सीन चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. अशातच एका सीनदरम्यान आर्यनला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं. तो सीन शूट करताना रक्तपात दाखवणं आवश्यक होतं, पण यावेळी आर्यनच्या हाताला खरंच लागलेलं होत. सीनदरम्यान आर्यनला याची जराही कल्पना नव्हती कारण सीन उत्तम होण्यासाठी तो विशेष मेहनत घेत होता. मात्र नंतर पाहिल्यावर आर्यनच्या हातापायाला दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. विशेष म्हणजे या चित्रपटात मुख्य कलाकार असल्याने आर्यन दिवसरात्र सीन शूट करण्यासाठी सेटवर असायचा. त्याने अभिनयाचे कोणतेही शिक्षण, वा वर्कशॉप न घेता स्वतःमध्ये असणाऱ्या अभिनयाच्या आवडीवर त्याने काम केलं.
अक्षय वाघमारे आर्यनचं कौतुक करत म्हणाला, "आर्यनचं खूप कौतुक करावं लागेल. आर्यनने शूट केलेला हा सीन वनटेक सीन होता. हा सीन शूट करताना तो ठेच लागून खाली पडला. तेव्हा त्याला दुखापतही झाली. मात्र त्यानंतर तो उठून पुन्हा कॅरेक्टरमध्ये घुसला. आर्यनचं यासाठी खूप कौतुक करावं लागेल की, इतका लहान असूनही सीन शूट करताना त्याला चांगली समज आहे".
'खुर्ची' कधी प्रदर्शित होणार?
चित्रपटातील एका सीनसाठी या लहानग्याने घेतलेली ही विशेष मेहनत अर्थात वाखाणण्याजोगी आहे. त्याच्या या जिद्दीला सलाम. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष कुसुम हगवणे यांची असून दिग्दर्शक शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमरीत्या पेलवली आहे. येत्या 12 जानेवारी 2024 ला आर्यनची जबरदस्त एन्ट्री मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरेल.
संबंधित बातम्या