Smriti Irani: "भिडू वजन कमी कर, अंडी खा, वांगी खा"; जॅकी श्रॉफसोबतच्या फोटोला स्मृती इराणींनी दिलं भन्नाट कॅप्शन
Smriti Irani: स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि जेडी मजेठिया (JD Majethia) यांच्यासोबतचा फोटो शेअर केले आहे. या फोटोला त्यांनी मजेशीर कॅप्शन दिलं आहे.
Smriti Irani: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) या सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतात. नुकतीच स्मृती इराणी यांनी एक मजेशीर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि जेडी मजेठिया (JD Majethia) यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
स्मृती इराणी यांची पोस्ट
स्मृती इराणी यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. यामधील एका फोटोमध्ये त्या जॅकी श्रॉफ यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्या जेडी मजेठिया यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहेत. या फोटोंना त्यांनी कॅप्शन दिलं, "डाएट की सलाह के दो प्रकार - मेहनत बहुत लेकिन कोई चमत्कार नहीं, 1) भिडू वजन कमी कर.. फिट रेह फॅट मत हो रे, अंडी खा, वांगी खा, ब्रेड मत खा रे. 2) वजन कम कर... डाएट कर किसी को पता नहीं चलेगा"
स्मृती इराणी यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं स्मृती इराणी यांनी शेअर केलेल्या पोस्टला कमेंट केली, "तुमचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "सुनो सबकी करो मन की बात"
View this post on Instagram
जॅकी श्रॉफनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहेत. तो गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वृक्षारोपणाच्या महत्त्वाचा प्रचार करताना दिसत आहे. तो एक छोटे रोप घेऊन सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतो. तर जेडी मजेठिया यांचा खिचडी-2 हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता.
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेमुळे स्मृती इराणी यांना विशेष लोकप्रिया मिळाली. या मालिकेतील स्मृती इराणी यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. त्यानंतर त्यांनी अभिनय सोडून राजकारणात एन्ट्री केली. 2003 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
इतर महत्वाच्या बातम्या: