Telly Masala : तीन अडकून सीतारामचा धमाकेदार टीझर रिलीज ते 'बॉईज 4'चं पोस्टर आऊट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Last Updated:
06 Sep 2023 05:58 PM
Malini Rajurkar: शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन
शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर (Malini Rajurkar) यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
Read More
Telly Masala : तीन अडकून सीतारामचा धमाकेदार टीझर रिलीज ते 'बॉईज 4'चं पोस्टर आऊट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Read More
Raghav Chadha Parineeti Chopra : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या निमंत्रण पत्रिकेची पहिली झलक समोर; पाहा फोटो
Raghav Chadha Parineeti Chopra : राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या निमंत्रण पत्रिकेची पहिली झलक आता समोर आली आहे.
Read More
Boyz 4 : कबीर, ढुंग्या, धैर्या पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'बॉईज 4'चं पोस्टर आऊट!
Boyz 4 : 'बॉईज 4' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
Shubhangi Gokhale: शुभांगी गोखलेंच्या लेकीची खास पोस्ट; आईची मालिका पाहिल्यानंतर सखी म्हणाली, 'अम्मा ...'
सखी गोखलेनं नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Read More
Teen Adkun Sitaram: तीन तरुणांची भन्नाट गोष्ट; तीन अडकून सीतारामचा धमाकेदार टीझर रिलीज, चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
तीन अडकून सीताराम (Teen Adkun Sitaram) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.
Read More
Jui Gadkari Exclusive : 'ठरलं तर मग'नंतर जुईचं 'पुढचं पाऊल', खऱ्या लग्नाबाबत मोठी अपडेट समोर
Jui Gadkari Wedding : जुई गडकरी 4 फेब्रुवारी 2024 मध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत.
Read More
Ankita Lokhande: 'तीन महिने घरी गेले नव्हते, 148 तास शूटिंग केले'; अंकिता लोखंडेनं सांगितलं पवित्र रिश्ता मालिकेच्या शूटिंगबाबत
Ankita Lokhande Recalls Pavitra Rishta Days: अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेचं शूटिंग करताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं.
Read More
Bhushan Pradhan: अभिनेत्यानं सांगितला ‘भूषण सीमा प्रधान’ नावामागचा किस्सा; म्हणाला, 'अनेकांना वाटतं...'
Bhushan Pradhan: भूषणनं नुकताच त्याच्या नावामागील किस्सा एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे.
Read More
Pooja Sawant : गणेशचतुर्थीपासून पुढचे दहा दिवस माझं डाएट बंद; मोदकावर ताव मारायला पूजा सावंत सज्ज
Kalavantancha Ganesh : एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' या सेगमेंटमध्ये कलरफुल पूजा सावंतने (Pooja Sawant) बाप्पासोबतच्या आठवणी सांगितल्या आहेत.
Read More
Kaun Banega Crorepati 15: 'कौन बनेगा करोडपती 15' शोमध्ये पंजाबचा जसकरण जिंकू शकला नाही सात कोटी; तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर?
Kaun Banega Crorepati 15: पंजाबचा जसकरण हा केबीसीच्या 15 व्या सीझनचा पहिला करोडपती झाला आहे. मात्र, सात कोटींच्या प्रश्नाचं उत्तर जसकरणला देता आलं नाही.
Read More
Sourav Ganguly Biopic : क्रिकेटच्या मैदानावरील 'दादा'ची भूमिका साकारणार आयुष्मान खुराना; मुलाखतीदरम्यान केला खुलासा
Ayushmann Khurrana In Sourav Ganguly Biopic : क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये आयुष्मान खुरानाची एन्ट्री झाली आहे.
Read More
Kangana Ranaut : G-20 निमंत्रण पत्रिकेवरुन कंगना रनौतचं ट्वीट; म्हणाली,"आपण भारतीय आहोत...इंडियन नाही"
Kangana Ranaut : जी-20 निमंत्रण पत्रिकेवरुन कंगना रनौतने ट्वीट केलं आहे.
Read More
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश
भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'
Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो. 'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.
Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज
Jawan Trailer Release: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे. तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.