Donald Trump-Elon Musk न्यूयॉर्क : अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी काल शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला जगभरातील मान्यवर उपस्थित होते. मात्र, अध्यक्षपदाची शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प संकटात सापडले आहेत. याशिवाय टेस्लाचे प्रमुख एलन मस्क देखील अडचणीत आले आहेत. अमेरिकन फेडरशन ऑफ गव्हर्नमेंट एम्पलॉईज आणि नॉन प्रॉफिट पब्लिक सिटिजन या दोन्ही संस्थाकंकडू डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएन्सी योजनेवरुन गुन्हा दाखल करण्यात  आहे. ट्रम्प यांच्या DOGE योजनेचं नेतृत्त्व एलन मस्क यांच्याकडे असून सरकारी खर्चात कपात करणं हा त्याचा उद्देश आहे.  


डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं प्रस्तावित DOGE योजनेचं ध्येय सरकारी खर्चामध्ये 2 ट्रिलियन कपात करण्याचं ठेवलं आहे. या योजनेमुळं सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याच्या भीती वाटू लागली आहे. एफजीएईनं DOGE ही योजना संघराज्याच्या नियमांचं पालन करत नसल्याचं म्हटलं आहे. याशिवाय कोर्टात याचिका दाखल करुन DOGE ला सल्लागार समितीप्रमाणं काम करण्यापासून रोखावं असं म्हटलं आहे. जोपर्यंत ती समिती आवश्यक नियमांचं पालन करत नाही तोपर्यंत रोखलं जावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. 


एलन मस्क यांची भूमिका काय?


डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिअन्सीची जबबादारी एलन मस्कवर सोपवण्यात आली आहे. मस्क यांच्या भूमिकेवरुन अनेक जणांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मस्क यांच्या योजना सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या आणि आर्थिक हितसबंधांवर चुकीचा प्रभाव टाकू  शकतात, असा दावा केला जातोय. एफजीईनं याबाबत नाराजजी व्यक्त करत योनेच्या माध्यमातून केली जाणारी कपात कर्मचाऱ्यांच्या नोकरीसाठी धोकादायक असेल, असं म्हटलंय.  


 
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपधविधीनंतर घोषणा


डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर 20 जानेवारीला मुक्तीचा दिवस म्हणडे लिबरेशन डे म्हटलं. याशिवाय अमेरिकेचं सुवर्णयुग सुरु झालंय असं ते म्हणाले. ट्रम्प यांनी त्यांच्या अजेंड्यावर अमेरिका प्रथम असल्याचं म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला सुरक्षित, ऊर्जेच्या क्षेत्रात अग्रणी करण्यासाठी धाडसी पावलं उचलणार असल्याचं म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी  जो बायडन यांच्या प्रशासनाच्या धोरणांमध्ये बदल करण्यासाठी आदेश दिल्याची घोषणा केली. देशाच्या सीमा सुरक्षित करण्याचे आदेश देखील ट्रम्प यांनी दिला.


इतर बातम्या :