(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pooja Sawant : गणेशचतुर्थीपासून पुढचे दहा दिवस माझं डाएट बंद; मोदकावर ताव मारायला पूजा सावंत सज्ज
Kalavantancha Ganesh : एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' या सेगमेंटमध्ये कलरफुल पूजा सावंतने (Pooja Sawant) बाप्पासोबतच्या आठवणी सांगितल्या आहेत.
Pooja Sawant On Kalavantancha Ganesh : कलरफुल पूजा सावंत (Pooja Sawant) नेहमीच तिच्या सिनेमांमुळे आणि प्राणीप्रेमामुळे चर्चेत असते. आता एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' (Kalavantancha Ganesh) या सेगमेंटमध्ये अभिनेत्रीने बाप्पासोबतच्या तिच्या आठवणी सांगितल्या आहे. गणपती बाप्पा हा कलेचं दैवत असून तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, असं पूजा सावंत म्हणाली.
एबीपीसोबत बोलताना पूजा सावंत म्हणाली,"गणपती बाप्पा हे कलेचं दैवत आहे. मी चार-पाच वर्षांची असताना पहिलं नृत्य केलं ते 'ओंकार स्वरुपा' होतं. तेव्हापासून ते आतापर्यंत बाप्पा कायमच माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आमचा सावंतांचा मूळ गणपती कोकणात असतो. आता गेल्यावर्षीपासून मुंबईतच्या घरी बाप्पा बसवायला सुरुवात केली असून तो दीड दिवसांचा असतो".
बाप्पासोबतची एक आठवण शेअर करत पूजा म्हणाली," बाप्पा माझ्या पाठीशी आहे, असं मला सतत वाटतं. पण 'जंगली' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तेव्हा मी हत्तींसोबत होते. हत्तीनीसोबत मला वेळ घालवायचा असे. दररोज पहाटे जंगलातून तिच्याकडे जाताना तिथे एक छोटसं गणपतीचं मंदिर होतं. तिथे पहाटे पाच वाजता गणपती बाप्पासमोर बसून त्या काळोखात मी अर्थवशिर्षकाचं पठण करायचे आणि मग पुढे हत्तीनीला भेटायला जंगलाच जायचे. त्या जंगलात, हत्तीनीसोबत वेळ घालवताना मला वाटलं की मी गणपती बाप्पासोबत राहतेय".
सण साजरे करताना निसर्गाची हानी झालेली मला आवडत नाही : पूजा सावंत
पूजा सावंत पुढे म्हणाली,"सध्या आगामी कलाकृतीचं शूटिंग सुरू आहे. त्याची गडबड सुरू असल्यामुळे बाप्पाची आरास बनवण्याची धुरा माझी बहिण आणि भाऊ सांभाळत आहेत. मूर्तीची निवड मात्र मी केली आहे. शाडूचा बाप्पा आम्ही तिघांनी मिळून निवडला आहे. आपले सण साजरे करताना निसर्गाची हानी झालेली मला आवडत नाही. पेपरगणेशा किंवा शाडूच्या मातीची मूर्ती आम्ही निवडतो. यंदा शाडूचा बाप्पा आहे. तिघं भावंडांना जो बाप्पा आवडतो त्याची आम्ही निवड करतो".
पूजा सावंत म्हणतेय,"सध्या मी हार्डकोअर डाएट करत आहे. पण गणेशचतुर्थीपासून म्हणजेच गणपतीचा पहिला दिवस ते पुढचे दहा दिवस माझं डाएट बंद असेल. गणेशचतुर्थीपासून समोर येणारा प्रत्येक पदार्थ मी खाते. मोदक, खीर, शिरा, वरण-भात साजूक तूप असा पंचपक्वानाचा आहार मी करते".
संबंधित बातम्या