Beed: राज्यात वाढत्या गुन्हेगारीने समाजमन ढवळून निघालेले असतानाच बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार घडलाय.HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकण्यात आल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या कुटुंबातील मुलीचा एचआयव्हीने मृत्यू झाला अशी अफवा पसरल्याने पीडित कुटुंबासोबतचे व्यवहार लोकांनी थांबवले आहेत. गावाने वाळीत टाकले आहे, कोणीही जवळ येत नाही बोलतही नाही, यांना एचआयव्ही आहे. असं बोलत आहेत, त्यामुळे माझी पत्नी दोन वेळा आत्महत्येसाठी गेली होती, असं पीडित कुटुंबातील व्यक्तीने सांगितलं.ही अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात पीडित कुटुंबाचा आरोप आहे. (Beed News)


बीडच्या आष्टी तालुक्यात या घटेनेने खळबळ उडाली आहे. एचआयव्हीच्या अफवेमुळे पीडित कुटुंबातील महिलेने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. तर कुटुंबासोबतचे व्यवहार लोकांनी थांबले असल्याच पीडित कुटुंबच म्हणणं आहे. कुटुंबाच्या तक्रारीवरून आष्टी रुग्णालयातील डॉ.ढाकणे, आणि पोलीस कर्मचारी बीट अमलदार काळे यांच्या विरोधात तक्रार  दिली आहे..(Maharashtra News)


नक्की प्रकरण काय?


आष्टी तालुक्यातील एका गावात 23 वर्षीय तरुणीचा दहा-बारा दिवसांपूर्वी मृत्यू झाला .तो मृत्यू तिच्या आजारपणामुळे झाला .सासरी आजारी होती, त्यामुळे माहेरी आणून सोडल्यानंतर मुलीचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे . मात्र मुलीवर अंत्यसंस्कार झाले त्यावेळी डॉक्टर आणि पोलिसांनी कुटुंबीयांना मुलीला एचआयव्ही असल्याचं सांगत कुटुंबीयांनाही टेस्ट करून घेण्यास सांगितलं . डॉक्टर आणि पोलिसांनीच अशी माहिती दिल्याने कुटुंब हादरलं होतं . एचआयव्हीनेच मृत्यू झाला या माहितीची खातरजमा न करताच केलेल्या या वक्तव्यामुळे गावभर अफवा पसरली.  गावातील लोकांनी कुटुंबाला वाळीत टाकलं . ज्या कुटुंबातील मुलीचा मृत्यू झाला त्या कुटुंबाच्या शेजारीही उभ राहायलाही लोक तयार नाहीत . पोलीस आणि डॉक्टरांमुळे उठलेल्या अफवेमुळे कुटुंबाची मोठी बदनामी झाली . या विरोधात शेवटी कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली .डॉक्टरांचा आणि पोलिसांचं असं म्हणणं का होतं हे अद्याप समजू शकलेलं नाही . मुलीचा एचआयव्हीने मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याने गावातील लोकांनी कुटुंबाला वाईट टाकल्याचा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे .


पोलिसांसह डॉक्टरांची खोटी माहिती, पीडित कुटुंबियांचा आरोप


यासंदर्भात पीडित कुटुंबाने एक ऑडिओ क्लिप दाखवली यात पोलीस कर्मचारी काळे यांने तुमच्या मुलीला एचआयव्ही होता अस सांगत आहे. तिच्या अंत्यविधीला जवळ जे व्यक्ती होते त्यांची तपासणी करुन घ्या अशी भीतीही दाखवली.. मुलीच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून पोलीस आणि डॉक्टरांनी अशा पद्धतीने खोटं सांगितलं त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. गावाने वाळीत टाकले आहे, कोणीही जवळ येत नाही बोलतही नाही, यांना एचआयव्ही आहे. असं बोलत आहेत, त्यामुळे माझी पत्नी दोन वेळा आत्महत्येसाठी गेली होती, असं पीडित कुटुंबातील व्यक्तीने सांगितलं..


जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, आष्टीत खळबळ


आमची मुलगी मरण पावली पण आमच्या जवळचे देखील भेटायला आले नाही.. आता आजार आहे अशा अफवेने म्हटल्यावर घरातील मुलं देखील जवळ येत नाहीत.. फक्त अफेमुळे आमच्या वाट्याला हे दुःखाला आहे आम्हाला न्याय द्या अशी मागणी महिलांनी केली आहे. या प्रकरणात पीडित कुटुंबाने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणात पोलिस आणि आरोग्य विभागाने खोटा अहवाल दिल्याने आमच्या कुटुंबाची बदनामी झाली असून लोकांमध्ये सांगितल्याने लोक आम्हाला जवळ करत नाहीत.. सासरच्या मंडळाच्या सांगण्यावरून हे केलं आहे. असा आरोप त्यांनी केला आहे.


हेही वाचा:


Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले