Boyz 4 : कबीर, ढुंग्या, धैर्या पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'बॉईज 4'चं पोस्टर आऊट!
Boyz 4 : 'बॉईज 4' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Boyz 4 Poster Out : 'बॉईज 4' (Boyz 4) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कबीर, ढुंग्या, धैर्या पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. नुकतचं या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर आऊट झालं आहे. लवकरच हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'बॉईज 4' कधी होणार रिलीज? (Boyz 4 Release Date)
मराठी सिनेमांच्या इतिहासातील सुपरहिट ब्लॉकबस्टर 'बॉईज'च्या सिरीजने सर्वांचे भरभरून मनोरंजन केले आहे. 'बॉईज 3'च्या भरघोस यशानंतर आता 'बॉईज 4' धमाका करायला येत आहेत. नुकतेच 'बॉईज 4'चे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून 'आपण येणार तर धमाका होणार' असं म्हणत 'बॉईज 4' येत्या 20 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'बॉईज 4'चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया हे निर्माते आहेत तर ऋषिकेश कोळी यांनी सिनेमाचं लेखन केलं आहे. वैशिष्टय म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील हा एकमेव सिनेमा आहे, ज्याचे चार भाग आले आहेत. 'बॉईज'च्या तिन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालता होता. आता यंदाच्या वर्षी धैर्या, ढुंग्या आणि कबीर काय धमाका करणार आहेत, हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
View this post on Instagram
'बॉईज 4' बद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, "आतापर्यंत 'बॉईज'च्या तिन्ही भागांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. या तिन्ही भागांमध्ये काहीतरी सरप्राईस होते. 'बॉईज 4' मध्येही असेच सरप्राईस आहे. प्रेक्षकांचे मिळणारे प्रेम पाहूनच आम्हाला 'बॉईज 4' करण्याची प्रेरणा मिळाली. मला खात्री आहे, हा सिनेमाही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करेल".
अभिनेता पार्थ भालेरावने (Parth Bhalerao) 'बॉईज 4' (Boyz 4) या सिनेमाचं पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,"कबीर, ढुंग्या, धैर्या पुन्हा येणार, तर धमाका होणारच ना भाई...20 ऑक्टोबर थिएटरमध्ये धुमाकूळ घालायला येत आहेत आपले बॉईज". या पोस्टवर सेलिब्रिटींसह अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 'बॉईज 4' हा सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'बॉईज 3' मध्ये सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड, ओंकार भोजने आणि विदुला चौगुले यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
संबंधित बातम्या
Boyz 4: काय म्हणता ‘बॉईज 4’ही येणार? 'बॉईज 3'च्या जबदरस्त यशानंतर निर्मात्यांची घोषणा!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
