Premachi Goshta : तेजश्री प्रधानच्या 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत संजीवनी जाधव साकारणार कोळी व्यक्तिरेखा

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 02 Sep 2023 04:23 PM
Telly Masala : सई ताम्हणकर झाली मुंबईकर ते टीआरपीच्या शर्यतीत 'वेड' सिनेमाने मारली बाजी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Premachi Goshta : तेजश्री प्रधानच्या 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत संजीवनी जाधव साकारणार कोळी व्यक्तिरेखा
Premachi Goshta : 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत अभिनेत्री संजीवनी जाधव कोळी व्यक्तिरेखा साकारणार आहे. Read More
Gautami Patil Father : गौतमी पाटीलचे वडील सापडले बेवारस अवस्थेत; रुग्णालयात उपचार सुरू
Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटीलचे वडील बेवारस अवस्थेत सापडले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. Read More
Rajinikanth : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत भारतातील सर्वात महागडा अभिनेता!'जेलर'चं मानधन तब्बल 210 कोटी रुपये
Rajinikanth Highest Paid Actor : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हा भारतातील सर्वात महागडा अभिनेता बनला आहे. Read More
Ankita Walawalkar : राजकारण प्रवेशाच्या चर्चांना उधाण; कोकण हार्टेड गर्ल म्हणतेय,"बाप्पालाच जाऊन विचारणार"
Kalavantancha Ganesh : एबीपी माझाच्या 'कलावंतांचा बाप्पा' या सेगमेंटमध्ये 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू- वालावलकरने (Ankita Walawalkar) बाप्पासोबतचं तिचं असलेलं नातं यावर भाष्य केलं आहे. Read More
Tiger 3 First Poster Out : टायगर जिंदा है...'टायगर 3'चं पहिलं पोस्टर आऊट! सलमान-कतरिनाच्या लूकने वेधलं लक्ष
Tiger 3 : 'टायगर 3' या सिनेमाचं पहिलं पोस्टर आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More
Gadar 2 : सनी देओलचा 'गदर 2' ऑस्करच्या शर्यतीत? दिग्दर्शक अनिल शर्मांनी दिली महत्त्वाची माहिती
Gadar 2 Oscar : दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी 'गदर 2' हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत असण्याबाबत भाष्य केलं आहे. Read More
TRP Report : रितेश देशमुखच्या 'वेड' सिनेमाने टीआरपीच्या शर्यतीत मारली बाजी; 'ठरलं तर मग'ला टाकलं मागे
Ved Movie : रितेश देशमुखच्या 'वेड' या सिनेमाने टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. Read More
Sai Tamhankar : सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं स्वत:चं पहिलं घर; पोस्ट शेअर करत म्हणाली,"एक मैलाचा दगड गाठला"
Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकरने मुंबईत स्वत:चं पहिलं घर खरेदी केलं आहे. Read More
R Madhavan New President FTII : अभिनेता आर.माधवनची FTII च्या अध्यक्षपदी नियुक्ती; अनुराग ठाकुर यांनी ट्विट करत दिली माहिती
R Madhavan : अभिनेता आर.माधवनची एफटीआयआयच्या (FTII) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.