Gadar 2 : सनी देओलचा 'गदर 2' ऑस्करच्या शर्यतीत? दिग्दर्शक अनिल शर्मांनी दिली महत्त्वाची माहिती
Gadar 2 Oscar : दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी 'गदर 2' हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत असण्याबाबत भाष्य केलं आहे.
Sunny Deol Oscar Update : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. लवकरच हा सिनेमा 500 कोटींचा टप्पा पार करेल. सिनेमागृहात धुमाकूळ घालणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता हा सिनेमा ऑस्करच्या (Oscar) शर्यतीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी यासंदर्भात महत्त्वाची अपडेट शेअर केली आहे.
'गदर 2' या सिनेमाचा समावेश ऑस्करच्या शर्यतीत (Academy Awards) होणार असल्याने चाहतेदेखील आनंदी झाले आहेत. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत अनिल शर्मा म्हणाले,"गदर 2' या सिनेमाची ऑस्करला एन्ट्री पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. ऑस्करसाठी हा सिनेमा पाठवण्याची इच्छा अनेक मंडळी व्यक्त करत आहेत".
ऑस्करसाठी 'गदर 2' पात्र आहे : अनिल शर्मा
अनिल शर्मा पुढे म्हणाले,"गदर' हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत पाठवण्यात आला नव्हता. त्यामुळे 'गदर 2'ची एन्ट्री पाठवली जाईल की नाही हे मला माहिती नाही. पण आम्ही प्रयत्न करत आहोत. 'गदर 2' हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत असावा अशी आमची इच्छा आहे. ऑस्करसाठी हा सिनेमा पात्र आहे. 'गदर 2' हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे".
अनिल शर्मा पुढे म्हणाले,"एवढ्या वर्षात मी कामचं केलेलं नाही, असं मला वाटतं. पुरस्कार सोहळ्याच्या पॅनलमध्ये कोण बसतं हे माहिती नाही. आजवर मला एकही पुरस्कार मिळालेला नाही. दरवेळी पुरस्कार सोहळ्याला जाताना मी नवा कोट परिधान करतो. पण मला एकही पुरस्कार मिळत नाही. पुरस्कार मिळालेला नसला तरी लोकांनी, चाहत्यांनी आमच्यावर खूप प्रेम केलं आहे. गेल्या 40 वर्षांपासून मी सिनेमे बनवत आहे. काही सिनेमे हिट झाले तर काही फ्लॉप. चांगल्या सिनेमांची निर्मिती करण्यावर माझा भर असतो. प्रेक्षकांनाही हे सिनेमे आवडतात".
बॉक्स ऑफिसवर 'गदर 2'चा बोलबाला (Gadar 2 Box Office Collection)
'गदर 2' हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'गदर 2' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 40.1 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात 284.63 कोटी, दुसरा दिवस 134.47 कोटी, तिसरा दिवस 63.35 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच आतापर्यंत या सिनेमाने 487.65 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं आहे. लवकरच हा सिनेमा 500 कोटींचा टप्पा पार करेल.
संबंधित बातम्या