Telly Masala : जुई गडकरी महाराष्ट्राची फेव्हरेट ते मुग्धा वैशंपायन अन् प्रथमेश लघाटेने सांगितलं लग्नाचं योग्य वय; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 20 Oct 2023 06:00 PM
Kaala Paani Review : 'काला पानी' कशी आहे? वाचा रिव्ह्यू
Kaala Paani : 'काला पानी' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. Read More
Telly Masala : जुई गडकरी महाराष्ट्राची फेव्हरेट ते मुग्धा वैशंपायन अन् प्रथमेश लघाटेने सांगितलं लग्नाचं योग्य वय; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Bigg Boss 17 Contestants Fees : अंकिता लोखंडे ते मुनव्वर फारुकी; 'बिग बॉस 17'साठी स्पर्धकांनी घेतलंय तगडं मानधन
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'मध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी चांगलच मानधन घेतलं आहे. Read More
Tharala Tar Mag : जुई गडकरी महाराष्ट्राची फेव्हरेट! टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' पहिल्या क्रमांकावर
Tharala Tar Mag : जुई गडकरीच्या 'ठरलं तर मग' या मालिकेला या आठवड्यात सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे. Read More
Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत नवा ट्विस्ट; पंचपिटिका रहस्याच्या शोधात नेत्रा
Satvya Mulichi Satavi Mulgi : सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत लवकरच पंचपिटिका रहस्याचा जन्म होणार आहे. Read More
Ganapath Review : टायगर श्रॉफचा 'गणपत' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
Ganapath : अभिनेता टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) 'गणपत' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Alia Bhatt : आलिया भट्टने खरेदी केली लक्झरी कार; किंमत ऐकूण व्हाल हैराण
Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने लक्झरी कार खरेदी केली आहे. Read More
Leo Box Office Collection : थलापती विजयचा 'लियो' सुपरहिट! पहिल्याच दिवशी सहा रेकॉर्डसह बॉक्स ऑफिसवर पडला पैशांचा पाऊस
Thalapathy Vijay : थलापती विजयच्या 'लियो' (Leo) या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी दणदणीत कमाई करत सहा रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. Read More
Koffee With Karan 8 : करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8'च्या पहिल्या भागात सहभागी होणार बॉलिवूडचं पावरफुल कपल; 'या' दिवशी सुरू होणार शो
Koffee With Karan 8 : करण जोहरचा 'कॉफी विथ करण 8' हा कार्यक्रम लवकरच सुरू होत असून पहिल्याच भागात बॉलिवूडचं पावरफुल कपल सहभागी होणार आहे. Read More
Shilpa Shetty आणि Raj Kundra विभक्त? 'त्या' ट्वीटमुळे चाहते संभ्रमात
Raj Kundra Tweet : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा विभक्त झाल्याचे म्हटले जात आहे. Read More
Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : लग्नाचं योग्य वय कोणतं? मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेने चाहत्यांना दिली माहिती
Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Jhimma 2 : "त्या परत येतायत"; 'झिम्मा 2'ची रिलीज डेट जाहीर! 'या' दिवशी होणार रिलीज
Jhimma 2 : 'झिम्मा 2' या सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. Read More
Akshay Kumar : अक्षय कुमारला वयाच्या 23 व्या वर्षी मिळालेलं पहिलं प्रेम; खिलाडीच्या पोस्टवर चाहते म्हणाले,"जुनं ते सोनं"
Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर जुन्या फोटोशूटचा एक फोटो शेअर केला आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.