Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : लग्नाचं योग्य वय कोणतं? मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेने चाहत्यांना दिली माहिती
Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' (Saregamapa Little Champs) फेम मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) काही दिवसांपासून लग्न ठरल्यामुळे चर्चेत आहेत. अशातच आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी लग्नाचं योग्य वय कोणतं याबद्दल भाष्य केलं आहे.
वैचारिक किडाच्या व्हिडीओमध्ये प्रथमेश लघाटे मुग्धाला विचारत आहे,"सध्या अठ्ठावीस-तिशीनंतर लग्नाचा विचार केला जातो? याबद्दल तुझं मत काय आहे?". यावर उत्तर देत मुग्धा म्हणते,"लग्नाचं योग्य वय कोणतं हे पूर्वजांनी खूप विचार करुन ठरवलं आहे. पूर्वीच्या काळी मुला-मुलीच्या वयात अंतर असायचं ते चुकीचं आहे. पण अमुक वयात मुला-मुलीचं लग्न व्हायला हवं यामागे लॉगिक आहे. आजकाल तरुणांना स्वातंत्र्य हवं असतं..त्यामुळे ते संसार उशीरा थाटण्याचा निर्णय घेतात. पण योग्यवेळी लग्न व्हायला हवं असं मला वाटतं".
View this post on Instagram
आताची पिढी लग्नापासून दूर पळतेय का?
प्रथमेश पुढे मुग्धाला विचारतो,"आताची पिढी लग्नापासून दूर पळतेय का?". उत्तर देत मुग्धा म्हणते,"आपल्या पिढीला मिळालेल्या स्वातंत्र्याची खूप जास्त सवय झाली आहे. या स्वातंत्र्यात जर कोणी दुसरा व्यक्ती आला तर ते स्वातंत्र्य जाणार का असं त्यांना वाटतं. जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नाही".
View this post on Instagram
मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेची लव्हस्टोरी जाणून घ्या... (Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate Lovestory)
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांची भेट झाली. या कार्यक्रमादरम्यान त्यांच्यात चांगली मैत्री झाली. कार्यक्रमानंतरही त्यांनी गाण्यांचे अनेक कार्यक्रम केले. या कार्यक्रमादरम्यान ते एकमेकांच्या चांगले संपर्कात आले. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या. अखेर एका कार्यक्रमाआधी प्रथमेशने मुग्धाला विचारलं. त्यानंतर तिने एक-दोन दिवस घेऊन विचार करुन प्रथमेशला आपला होकार कळवला.
संबंधित बातम्या