एक्स्प्लोर

Koffee With Karan 8 : करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8'च्या पहिल्या भागात सहभागी होणार बॉलिवूडचं पावरफुल कपल; 'या' दिवशी सुरू होणार शो

Koffee With Karan 8 : करण जोहरचा 'कॉफी विथ करण 8' हा कार्यक्रम लवकरच सुरू होत असून पहिल्याच भागात बॉलिवूडचं पावरफुल कपल सहभागी होणार आहे.

Koffee With Karan 8 : करण जोहरचा (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या कार्यक्रमाच्या प्रीमियरची चाहते प्रतीक्षा करत आहे. या कार्यक्रमात कोण-कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'कॉफी विथ करण 8'च्या पहिल्याच भागात बॉलिवूडचं पावरफुल कपल सहभागी होणार आहे. 

'कॉफी विथ करण 8'च्या सेटवरील बीटीएस व्हिडीओ करण जोहरने काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. या व्हिडीओमधील आयकॉनिक काऊच, ऑरेंज मग अशा सर्व गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. आता या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींबद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

'कॉफी विथ करण 8'च्या पहिल्या भागात हजेरी लावणार बॉलिवूडचं 'हे' पावरफुल कपल

मीडिया रिपोर्टनुसार, 'कॉफी विथ करण 8'च्या पहिल्या भागात दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हजेरी लावणार आहेत. काऊचवर बसून करण जोहरच्या प्रश्नांची उत्तरं देताना ते दिसणार आहेत. 'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर दीपिका आणि रणवीर पहिल्यांदाच एकत्र दिसतील. दीपिका आणि रणवीरसोबत 'कॉफी विथ करण 8'ची सुरुवात करावी, अशी करणची इच्छा आहे.

'कॉफी विथ करण 8' कधी होणार सुरू?

करण जोहरने दीपिका आणि रणवीरसोबत 'कॉफी विथ करण 8'च्या पहिल्या भागाचं शूटिंग केलं असल्याचीही चर्चा आहे. 26 ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. 'कॉफी विथ करण 8'च्या पहिल्या भागात दीपिका आणि रणवीर त्यांच्या नात्यासह अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसतील. 

'कॉफी विथ करण 8'मध्ये सहभागी होणार 'हे' सेलिब्रिटी

'कॉफी विथ करण 8'मध्ये कार्तिक आर्यन, रोहित शेट्टी, अजय देवगन, सारा अली खान, अनन्या पांडे, आलिया भट्ट, करीना कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन हे सेलिब्रिटी सहभागी होऊ शकतात. 'कॉफी विथ करण 8' हा कार्यक्रम 26 ऑक्टोबर 2023 पासून डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक पाहू शकतात. 

संंबंधित बातम्या

Koffee With Karan 8 : आयकॉनिक काऊच ते ऑरेंज मग; करण जोहरने दाखवली 'कॉफी विथ करण 8'ची झलक; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी

व्हिडीओ

Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Embed widget