Shilpa Shetty आणि Raj Kundra विभक्त? 'त्या' ट्वीटमुळे चाहते संभ्रमात
Raj Kundra Tweet : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा विभक्त झाल्याचे म्हटले जात आहे.
Raj Kundra Post : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या चर्चेत आहेत. 'यूटी 69' या सिनेमाच्या माध्यमातून राज कुंद्रा सिनेसृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. अभिनेता म्हणून राजचा हा पहिलाच सिनेमा असेल. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान राजने एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमुळे चाहते संभ्रमात पडले आहेत. याट्वीटनंतर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी वेगळे झाले का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
राजने सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त झाल्याचं जाहीर केलं आहे. पण या पोस्टमध्ये अभिनेत्याने कोणाचं नाव घेतलेलं नाही. पण तरीही शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विभक्त होणार का? असा प्रश्न चाहते उपस्थित करत असून ते हैराण झाले आहेत.
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी 2009 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाला आता 14 वर्षे पूर्ण होत आहेत. या 14 वर्षांच्या प्रवासात अनेकदा एकमेकांना अडचणींमध्ये ते मदत करताना दिसले आहेत. पण आता राज कुंद्राच्या 'त्या' ट्वीट नंतर राज आणि शिल्पाचं बिनसलं असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
राज कुंद्राचं ट्वीट काय आहे? (Raj Kundra Tweet)
राज कुंद्राने ट्वीट केलं आहे,"आम्ही वेगळे झालो आहोत आणि या कठीण काळात तुम्ही आम्हाला वेळ द्यावा ही विनंती". राजने या ट्वीटचा फोटो त्याच्या इंस्टा स्टोरीमध्येही शेअर केला आहे. राज कुंद्राच्या या ट्वीटवर विभक्त झालात, पब्लिसिटी स्टंट, राज नक्कीच त्याच्या मास्कबद्दल बोलत असणार, राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी वेगळे होणार, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. अद्याप शिल्पा शेट्टीने मात्र यासंदर्भात भाष्य केलेलं नाही.
We have separated and kindly request you to give us time during this difficult period 🙏💔
— Raj Kundra (@onlyrajkundra) October 19, 2023
राज कुंद्राचा 'यूटी 69' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
राज कुंद्रा सध्या त्याच्या 'यूटी 69' (UT 69) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पोर्नोग्राफी प्रकरणामुळे राज कुंद्रा चर्चेत आला होता. पण आता अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यासाठी तो सज्ज आहे. त्याच्या 'यूटी 69' या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर शेअर करत राजने लिहिलं होतं,"माझं आयुष्य रोलर कोस्टरसारखं होतं. त्याचा एक भाग तुमच्यासोबत शेअर करत आहे". तर शिल्पानेही या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला होता. ट्रेलर शेअर करत तिने लिहिलं होतं,"कुकी..खूप खूप शुभेच्छा...तू एक धाडसी व्यक्ती असून मला तुझं खूप कौतुक वाटतं". 'यूटी 69' हा सिनेमा 3 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या