एक्स्प्लोर

Akshay Kumar : अक्षय कुमारला वयाच्या 23 व्या वर्षी मिळालेलं पहिलं प्रेम; खिलाडीच्या पोस्टवर चाहते म्हणाले,"जुनं ते सोनं"

Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर जुन्या फोटोशूटचा एक फोटो शेअर केला आहे.

Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'मिशन रानीगंज' (Mission Raniganj) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात मात्र हा सिनेमा कमी पडला. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अशातच खिलाडीने आता एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अक्कीचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

"कॅमेरा' माझं पहिलं प्रेम"; खिलाडी कुमारचा खुलासा 

अक्षयने आपला फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. फोटो शेअर करत त्याने खास पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिलं आहे,"आयुष्यात पहिल्यांदा केलेली कोणतीही गोष्ट नेहमीच खास असते. हा फोटोही माझ्यासाठी खूपच खास आहे. हा फोटो काढला तेव्हा कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याची माझी पहिलीच वेळ होती. त्यावेळी मी 23 वर्षांचा होतो. मला काही कळण्याआधीच कॅमेरा माझं पहिलं प्रेम झालं होतं". 

View this post on Instagram
 
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

खिलाडीचे चाहते रमले जुन्या आठवणीत

खिलाडी कुमारचा फोटो पाहिल्यानंतर चाहते जुन्या आठवणीत रमले आहेत. जुनं ते सोनं, पुन्हा ते दिवस आले आहेत, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे सर, अनेक अभिनेते येतात आणि जातात पण तुझ्यासारखा तुच आहेस, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. अक्षयच्या फोटो पाहून एका चाहत्याने तर लिहिलं आहे,"तुमचा सिनेमा पाहायला आम्ही शाळा-कॉलेजमधून बंक मारुन जायचो". 

अक्षयच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Akshay Kumar Upcoming Movies)

अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज' हा सिनेमा 6 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. खिलाडी कुमार या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत स्क्रिन शेअर करताना दिसली. खिलाडी आता रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' (Singham Again) या सिनेमात झळकणार आहे. 'सिंघम अगेन' हा मल्टीस्टारर सिनेमा आहे. अक्षयसह या सिनेमात अजय देवगन, करीना कपूर खान, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि टायग श्रॉफ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 

अक्षयने अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. 'स्काय फोर्स' हा त्याचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तसेच अभिनेत्याचे 'वेलकम टू द जंगल', 'बडे मिया छोटे मिया','हाऊसफुल्ल 5' आणि 'सिंघम अगेन' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.  

संबंधित बातम्या

Akshay Kumar : अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज' ऑस्करच्या शर्यतीत? निर्मात्यांचा मोठा निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदाMuddyache Bola Amaravati| बडनेराचा गड राणा दाम्पत्य राखणार की नवीन चेहऱ्याला संधी मिळणार?Pankaja Munde : महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे' घोषणांची गरज नाही : पंकजा मुंडेAshish Deshmukh : गडकरींच्या गावात भाजपची हवा;आशिष देशमुखांच्या रॅलीत लोकांचा उत्साह

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Sharad Pawar In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
'ऑडी' इंडियाकडून नवीन लॅव्हिश ऑडी क्‍यू 7 चं बुकिंग सुूरू, लाँचिंगची तारीख ठरली; ताशी 250 चा हायस्पीड
'ऑडी' इंडियाकडून नवीन लॅव्हिश ऑडी क्‍यू 7 चं बुकिंग सुूरू, लाँचिंगची तारीख ठरली; ताशी 250 चा हायस्पीड
kolhapur dakshin Vidhan Sabha : कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
... तर शेतकऱ्यांप्रमाणे आपण पण आत्महत्या केलेल्या बऱ्या; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल, दिलं आव्हान
... तर शेतकऱ्यांप्रमाणे आपण पण आत्महत्या केलेल्या बऱ्या; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल, दिलं आव्हान
Embed widget