Raj Kundra : पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रावर कारवाईसाठी वेगवान हालचाली, ईडीकडून दुसरं समन्स जारी
Raj Kundra : पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला ईडीकडून दुसरं समन्स बजावण्यात आलं आहे.
Raj Kundra : पॉर्नोग्राफी प्रकरणी ईडीने शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) नवरा राज कुंद्राला (Raj Kundra) दुसरं समन्स पाठवलं आहे. ईडीने राज कुंद्राला 4 तारखेला पुन्हा तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगिलंय. याआधीही राज कुंद्राला ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण राज कुंद्रा या चौकशीसाठी हजर राहिला नाही. तसेच त्याने ईडीकडे वेळही मागितला होता. त्यानंतर ईडीने 4 तारखेला पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीच्या सांताक्रुझ येतील घरावर ईडीने छापा टाकला. पोर्नोग्राफी केससंर्भात मुंबई आणि उत्तर प्रदेशात 15 ठिकाणी छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली होती. मिळालेल्या माहितीनुसार सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र यांच्याशी निगडीत असलेल्या काही खटल्यांप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.
अॅडल्ट कन्टेंट निर्मिती आणि अशा प्रकारच्या कन्टेंन्टचे मोबाईलच्या अॅपच्या माध्यमातून वितरण केल्याचा राज कुंद्रावर आरोप आहे. याच खटल्यासंदर्भात त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. याच आरोपांखाली राज कुंद्रा काही दिवस तुरुंगात होता. आता तो या खटल्यात जामिनावर बाहेर आहेत.
काय आहे प्रकरण?
2021 मध्ये 4 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाने मुंबईच्या मालाडमधील मालवणी इथल्या एका बंगल्यावर छापा टाकला होता. या बंगल्यात अश्लील चित्रपट चित्रीत केले जात असून त्यासाठी मुलींवर दबाव टाकला जात होता, असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्या बंगल्यातून पाच जणांना अटक करण्यात आली होती. आणि त्यानंतर 9 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी पहिल्यांदा 3 एप्रिल रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं आणि त्यानंतर जुलै महिन्यात राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार थॉर्प यांना अटक केली. त्यानंतर पुरवणी आरोपपत्रात कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षी आणि यश ठाकूर यांना वॉण्टेड जाहीर करण्यात आलं.
2018 सालीही राज कुंद्रा वादात
राज कुंद्रा हे 2018 सालीदेखील वादात सापडला होता. सक्तवसुली संचालनालयाने राज कुंद्राची 2018 साली 2000 कोटी रुपयांच्या बिटकॉईन घोटाळ्याबाबत चौकशी केली होती. दरम्यान, ईडीने केलेल्या या कारवाईमुळे राज कुंद्रा तसेच शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.