मोठी बातमी! अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरावर ईडीचा छापा
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरावर ईडीने छापेमारीची कारवाई केली आहे. तिच्या घरात सर्च ऑपरेशन केले जात आहे.
Shilpa Shetty House ED Raid : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty ED Raid) हीच्या सांताक्रुझ येतील घरावर ईडीने छापा टाकला आहे. पोर्नोग्राफी केससंर्भात मुंबई आणि उत्तर प्रदेशात 15 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीच्याही घरी ईडीने ही कारवाई केली आहे.
ईडीने सर्च ऑपरेशन का केलं?
मिळालेल्या माहितीनुसार सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने (ED) शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र यांच्याशी निगडीत असलेल्या काही खटल्यांप्रकरणी ही कारवाई केली आहे. अडल्ट कन्टेंट निर्मिती आणि अशा प्रकारच्या कन्टेंन्टचे मोबाईलच्या अॅपच्या माध्यमातून वितरण केल्याचा राज कुंद्रा यांच्यावर आरोप आहे. याच खटल्यासंदर्भात त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. याच आरोपांखाली राज कुंद्रा काही दिवस तुरुंगात होते. आता ते या खटल्यात जामिनावर बाहेर आहेत.
ईडीकडून एकूण 15 ठिकाणी छापेमारी
अडल्ट कन्टेन्ट तयार करण्याबाबतच्या आरोपत राज कुंद्रा यांच्या कंपनीचे नाव आले होते. याच प्रकरणाचा तपास करण्यासाठी ईडीने आज उत्तर प्रदेश आणि मुंबईत एकूण 15 ठिकाणी छापेमारी केली आहे. यात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घराचाही सहभाग आहे. या छापेमारीत ईडीकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.
97 कोटींची मालमत्ता केली होती जप्ता
2021 साली राज कुंद्रा यांच्यावर वरील आरोप करण्यात आले होते. याच प्रकरणासंदर्भात कारवाई म्हणून एप्रिल 2024 मध्ये ईडीने राज कुंद्रा यांची 97 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा म्हणजेच PMLA, 2002 अंतर्गत राज कुंद्रा यांच्यावर सध्या खटला चालू आहे.
2018 सालीही राज कुंद्रा वादात
राज कुंद्रा हे 2018 सालीदेखील वादात सापडले होते. सक्तवसुली संचालनालयाने राज कुंद्र यांची 2018 साली 2000 कोटी रुपयांच्या बिटकॉईन घोटाळ्याबाबत चौकशी केली होती. दरम्यान, ईडीने केलेल्या या कारवाईमुळे राज कुंद्रा तसेच शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Shilpa Shetty Video News :
हेही वाचा :
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!