Drugs case | व्हायरल व्हिडिओ संदर्भात NCB ने करण जोहरकडे मागवली माहिती
Drugs case | ड्रग्स केसचा तपास करणाऱ्या NCB ने बॉलिवूड डायरेक्टर करण जोहरशी संबंधित काही लोकांना समन्स बजावलं आहे. त्यामुळे करण जोहरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई: NCB ने ड्रग्स केसच्या तपासासंदर्भात बॉलिवूड डायरेक्टर करण जोहरशी संबंधित काही लोकांना समन्स बजावले आहे. या प्रकरणात आता करण जोहरची चौकशी होऊ शकते ही शक्यता बळावली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज केस संबंधी व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत करण जोहरकडे NCB ने माहिती मागवली आहे. याची माहिती देण्यासाठी करण जोहरने प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक नाही. तो आपल्या प्रतिनिधीला पाठवू शकतो असही NCB ने स्पष्ट केलंय. 2019 सालच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओत करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीत अनेक बॉलिवूडचे स्टार्स उपस्थिच होते असं दिसतंय.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर NCB ने बॉलिवूडमध्ये पसरलेल्या ड्रग्जच्या जाळ्याबद्दल तपास करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक लोकांना NCB ने अटक केली आहे.
NCB ने दिपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर सहित अनेकांची चौकशी केली आहे. या प्रकरणात अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेन्डची चौकशीही करण्यात आली असून अर्जुनच्या गर्लफ्रेन्डचा भाऊ या ड्रग्ज केसचा सूत्रधार असल्याचंही NCB च्या तपासातून समोर आलं आहे. त्यासंबंधी अर्जुन रामपालला NCB ने दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे.
करण जोहरच्या घरी झालेल्या या पार्टीची तक्रार शिरोमणी अकाली दलाचे नेते मंजिंदर सिंह सिरसा यांनी NCB चे प्रमुख राकेश अस्थाना यांच्याकडे केली होती. या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत दिपिका पादुकोन, अर्जुन कपूर, विकी कौशल, वरुण धवन, रणबीर कपूर, मलाइका अरोरा आणि इतर अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
- Drugs Case | अर्जुनच्या गर्लफ्रेंडच्या भावाचं बॉलिवूडमध्ये ड्रग्सचं जाळं; व्हॉट्सअॅप चॅटमधून खुलासा
- बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालला NCBकडून पुन्हा समन्स; आज चौकशी
- Drug Case | सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी NCBची मोठी कारवाई; ड्रग्ज पेडलर रिगल महाकालला अटक
- Drugs Case | कॉमेडियन भारती आणि हर्षला दिलासा, जामीन मंजूर