Drishyam 2 Box Office Collection : दहाव्या दिवशीही 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर सुसाट; लवकरच गाठणार 200 कोटींचा टप्पा
Drishyam 2 : 'दृश्यम 2' हा सिनेमा रिलीजच्या दहाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
Drishyam 2 Box Office : सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) सध्या 'दृश्यम 2' (Drishyam 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची कमाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रिलीजच्या दहाव्या दिवशीही हा सिनेमा कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे.
'दृश्यम 2'ची कमाई :
- पहिला दिवस - 15.38 कोटी
- दुसरा दिवस - 21.59 कोटी
- तिसरा दिवस - 27.17 कोटी
- चौथा दिवस - 11.87 कोटी
- पाचवा दिवस - 11 कोटी
- सहावा दिवस - 9.55 कोटी
- सातवा दिवस - 9 कोटी
- आठवा दिवस - 7.87 कोटी
- नऊवा दिवस - 14.05 कोटी
- दहावा दिवस - 17-18 कोटी
- एकूण कमाई - 140 कोटींपेक्षा अधिक
बॉक्स ऑफिसवर 'दृश्यम 2'चा बोलबाला
'दृश्यम 2' हा सिनेमा 18 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. गेल्या सात दिवसांपासून हा सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता हा सिनेमा यावर्षातील सुपरहिट सिनेमांच्या यादीत सामिल झाला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या माहितीनुसार,'दृश्यम 2' ने बॉक्स ऑफिसवर 17 ते 18 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
View this post on Instagram
'दृश्यम 2'चं कथानक काय?
'दृश्यम 2' या सिनेमात अजय देवगण विजय साळगावकरच्या भूमिकेत आहे. विजय साळगावकर हा एका थिएटरचा मालक आहे. तो सिनेमांसाठी प्रचंड वेडा आहे. त्याला एक सिनेमा करायचा असल्याने तो एका लेखकाची भेट घेतो. त्याने लिहिलेल्या कथेवर तो समाधानी नसतो. त्यामुळे विजय पुन्हा नव्या कथानकावर काम करायला सुरुवात करतो. तर दुसरीकडे त्याचे कुटुंबीय सात वर्षांपूर्वी घडलेली घटना विसरलेले नाहीत. त्यामुळे आता पुढे काय होईल हे प्रेक्षक सिनेमात पाहू शकतात.
'दृश्यम 2' या सिनेमाची निर्मिती 50 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. थरार-नाट्य असणाऱ्या या सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत असून ब्बू, श्रेया सरन आणि अक्षय खन्नादेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून आता ते या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. तर दुसरीकडे रिलीजच्या सहा आठवड्यानंतर 'दृश्यम 2' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या