एक्स्प्लोर

Diwali 2023 : दिवाळीत रिलीज झालेल्या 'या' सिनेमांनी निर्मात्यांचं दिवाळं काढलं; बॉक्स ऑफिसवर झाले सुपरफ्लॉप

Diwali Movies : दिवाळीत रिलीज झालेले अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले आहेत.

Diwali Movies : दिवाळीच्या (Diwali 2023) मुहुर्तावर अनेक सिनेमे रिलीज करण्यात येत असतात. दिवाळीत रिलीज होणाऱ्या सिनेमांची संख्यादेखील जास्त असते. यंदादेखील सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. भाईजानच्या या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. पण दिवाळीत प्रदर्शित झालेले काही सिनेमे मात्र बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडले आहेत. 

सिनेमाचं नाव : सांवरिया (Saawariya)

संजय लीला भन्साळी यांचा 'सांवरिया' हा सिनेमा 2007 मध्ये दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज करण्यात आला होता. या सिनेमात रणबीर कपूर आणि सोनम कपूर महत्त्वाच्या भूमिकेत होते. बॉक्स ऑफिसवर मात्र हा सिनेमा सुपरफ्लॉप ठरला होता. रणबीरआधी या सिनेमासाठी प्रतीक बब्बरला विचारणा झाली होती.

सिनेमाचं नाव : अॅक्शन रिप्ले 1985 (Action Replayy 1985)

अक्षय कुमार, ऐश्वर्या राय बच्चन आणि आदित्य रॉय कपूर अभिनीत 'अॅक्शन रिप्ले' हा सिनेमा 'बॅक टू द फ्यूचर'चा रिमेक आहे. 2010 च्या दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला.

सिनेमाचं नाव : ब्लू (Blue)

'ब्लू' हा एक अॅक्शन ड्रामा असणारा सिनेमा आहे. अमेरिकन लेखक जोशुआ लूरी आणि ब्रायन एम. सुलिवन यांनी या सिनेमाचं कथानक लिहिलं आहे. या सिनेमात संजय दत्त , अक्षय कुमार, जायद खान आणि लारा दत्त मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात कतरिना कैफदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होती. या सिनेमाला प्रेक्षकांचा नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 2009 च्या दिवाळीत या सिनेमा प्रदर्शित झाला होता.

सिनेमाचं नाव : ठग्स ऑफ हिंदोस्तान (Thugs Of Hindostan)

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फ्लॉप ठरला. अमिताभ बच्चन, आमिर खान, कतरिना कैफ आणि फातिमा सना हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होते. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा जोरदार आपटला. 300 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त 150 कोटींचा गल्ला जमवला.

सिनेमाचं नाव : जान-ए-मन (Jane E Mann)

'जान-ए-मन' हा सिनेमा 2006 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात अक्षय कुमार, सलमान खान, प्रीती जिंटा आणि अनुपम खेर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला.

सिनेमाचं नाव : मैं और मिसेज खन्ना (Me and Mrs. Khanna)

'मैं और मिसेज खन्ना' हा सिनेमा 2009 च्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात सलमान खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते. पण बॉक्स ऑफिसवर मात्र मैं और मिसेज खन्ना जोरदार आपटला.

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : शाहरुखने चाहत्यांना दिली खास भेट; दिवाळीच्या मुहूर्तावर 'डंकी'चं नवं पोस्टर आऊट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget