Divya Bharti Death: दिव्या भारतीच्या मृत्यूचं काय होतं खरं कारण? अनेक वर्षांनी सहकलाकाराने केला धक्कादायक खुलासा
Divya Bharti Death: अभिनेत्री दिव्या भारती हिच्या मृत्यूचं गुढ अजूनही उमगलं नाहीये. दरम्यान त्यातच आता एका अभिनेत्याने या अभिनेत्रीविषयी एक धक्कादायक खुलासा केलाय.
Divya Bharti Death: दिव्या भारती (Divya Bharti) ही बॉलीवूडमधील सर्वात अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक होती. तिने लहान वयातच तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि तीन वर्षांतच ती इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री झाली. पण वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी या अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. मुंबईतील तिच्या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून तिचा मृत्यू झाला. दिव्याच्या निधनामुळे तिच्या चाहत्यांना बराच धक्का बसला होता. यानंतर दिव्याची हत्या करण्यात आली असून कोणीतरी तिला बाल्कनीतून ढकलून दिल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.
दरम्यान आता तिच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी दिव्याचा सह कलाकार अभिनेता कमल सदानाने तिच्या मृत्यूविषयी धक्कादायक खुलासा केल्याचं समोर आलंय. दिव्याच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न पडले होते. ज्याची उत्तरं अद्यापही कोणाला मिळाली नव्हती. त्यामुळे तिच्या मृत्यूविषयी अनेक शंका उपस्थित केल्या जातात. तसेच आजही दिव्याच्या मृत्यूबाबत अनेक संभ्रम आहेत, जे अद्यापही दूर झाले नाहीयेत.
अभिनेत्याने केला धक्कादायक खुलासा
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत कमल सदानाने यावर भाष्य केलं आहे. यावर त्याने म्हटलं की, तिच्या मृत्यूच्या बातमीने देखील हादरलो होतो. त्या बातमीवर विश्वास ठेवणं खरच खूप कठीण होतं. ती टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक होती आणि तिच्यासोबत काम करायला खूप मज्जा यायची. ती खूप मजेशीर व्यक्ती होती. त्यामुळे जेव्हा तिच्या निधनाची बातमी कळली तेव्हा हे कसं शक्य आहे? हा एकच प्रश्न मला पडला होता.
या कारणामुळे झाला होता दिव्या भारतीचा मृत्यू?
कमल सदाना पुढे म्हणाले की, दिव्या भारतीच्या मृत्यूच्या वेळी तिच्याकडे अनेक चित्रपट होते आणि ती एक मोठी स्टार बनू शकली असती. मला असं वाटतं की त्यावेळी तिने खूप ड्रींक केलं असावं. त्यामध्ये तिचा तोल गेला असावा. पण मला असं वाटतं की हा फक्त एक अपघात होता. कारण मी तिच्यासोबत शुटींग करत होतो आणि ती खूप खऊश होती.तिच्याकडे चित्रपटांची एक मालिका पूर्ण साईन केली होती. त्यामुळे तिच्याकडे कामही खूप होतं.
दिव्या भारतीच्या वडिलांनी केलं होतं महत्त्वाचं विधान
दिव्याला 'विश्वात्मा', 'शोला और शबनम' आणि 'दीवाना' यांसारख्या चित्रपटांमधून खूप प्रसिद्धी मिळाली. जेव्हा तिच्या मृत्यूच्या अफवा पसरू लागल्या, तेव्हा तिच्या वडिलांनी एक निवेदन जारी केले की हा संपूर्ण अपघात होता आणि खून आणि आत्महत्येचा प्रश्नच उद्भवत नाही."