Actress : लहान भावाचा मृत्यू, बहिण व्हेंटिलेटरवर, हातात कामही नाही; 'तारक मेहता' फेम अभिनेत्रीची परिस्थिती बिकट
Actress : मागील दीड वर्षांपासून परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचं अभिनेत्रीनं सांगितलं आहे. दरम्यान सध्या या अभिनेत्रीच्या हातात काम नसल्याचं तिनं म्हटलं.
Actress Jenifer in Trouble : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मागील अनेक दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. जेनिफरने काही दिवसांपूर्वी मालिकेचे निर्माते आसितकुमार मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. पण सध्या या अभिनेत्रीची परिस्थिती बिकट असल्याचं समोर आलं आहे. इतकच नव्हे तर या अभिनेत्रीची मागील दीड वर्षातली परिस्थितीही अत्यंत बिकट असल्याचं समोर आलं आहे.
जेनिफरच्या भाऊ या जगात नाही, त्यातच तिची बहिणीही आता व्हेंटिलेटरवर असल्याचं समोर आलं आहे. तसेच जेनिफरला सध्या कोणतंही काम देखील मिळत नसल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळए ही अभिनेत्री सध्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच संकटांचा सामना करत असल्याचं पाहायला मिळतंय.
जेनिफर वैयक्तिक आयुष्यात अडचणीत
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'तारक मेहता' फेम जेनिफर तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींमधून जात आहे. यावर जेनिफरने म्हटलं आहे की, माझ्या लहान बहिणीची प्रकृती गंभीर आहे. म्हणूनच मी माझ्या गावी आले आहे. माझी बहिण व्हेंटिलेटरवर आहे आणि सध्या तिला सर्वात जास्त माझी गरज आहे. तिची प्रकृती बरीच नाजूक आहे. ती सध्या तिच्या आयुष्यात मृत्यूशी झुंज देतेय.
मागील दीड वर्ष बेताची - जेनिफर
पुढे बोलताना जेनिफर म्हणाली की, मी मागील दीड वर्षांपासून बराच संघर्ष करतेय. माझ्या धाकट्या भावाच्या मृत्यूनंतर मी माझ्या माहेरच्या सात मुलींचा सांभाळ करत आहे. यावेळी असित मोदी प्रकरण घडले. सर्व गोष्टी एकत्र सांभाळणे माझ्यासाठी खूप अवघड होते. त्यामुळे गेले काही महिने माझ्यासाठी त्रासदायक होते. तसेच तारक मेहता ही मालिका सोडल्यानंतर जेनिफरला कोणताही रोल मिळाला नसल्याचं तिनं म्हटलं. पण असं एक प्रोडक्शन हाऊस आहे, ज्यांना माझासारख्या पात्राची गरज आहे. ते लोक मला अप्रोच करु शकतात.
काही दिवसांपूर्वी जेनिफरने 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते आसितकुमार मोदी यांच्याविरोधातला खटला जिंकला होता. त्या प्रकणात न्यायालयाने आसितकुमार मोदी यांना 5 लाखांचा दंड ठोठावला होता. पण अद्याप त्यांनी जेनिफरला नुकसान भरपाई दिली नसल्याची माहिती समोर आलीये.