एक्स्प्लोर

Disha Parmar Rahul Vaidya : कुणीतरी येणार येणार गं! दिशा परमार-राहुल वैद्यने दिली गुडन्यूज! सोशल मीडियावर शेअर केला थेट सोनोग्राफी रुममधला व्हिडीओ

Disha Parmar Rahul Vaidya : अभिनेत्री दिशा परमार आणि राहुल वैद्य लवकरच आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडप्याने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

Disha Parmar Rahul Vaidya Good News : लोकप्रिय गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) 2021 साली लग्नबंधनात अडकले. आता दिशा आणि राहुल लवकरच आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या जोडप्याने चाहत्यांना आता गुडन्यूज दिली आहे. 

राहुल वैद्य-दिशा परमारची खास पोस्ट (Rahul Vaidya Disha Parmar Shared Post)

दिशा परमार आणि राहुल वैद्यने हटके पद्धतीत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. सोशल मीडियावर त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही आनंदी दिसत असून राहुल वैद्यच्या हातात एक पाटी आहे. या पाटीवर 'आई आणि बाबा' असं लिहिलेलं दिसत आहे. हा फोटो शेअर करण्यासोबत त्यांनी सोनोग्राफी रुममधला एक फोटो आणि व्हिडीओदेखील शेअर केला आहे. हा बाळाचा अल्ट्रासाऊंड फोटो लक्ष वेधून घेणारा आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Disha Parmar Vaidya (@dishaparmar)

राहुल वैद्य आणि दिशा परमारने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"आई-बाबा आणि बाळातर्फे सर्वांना नमस्कार". राहुल आणि दिशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये राहुलने काळा टीशर्ट आणि जीन्स तर दिशाने काळ्या रंगाचा वनपीस घातला आहे. दोघेही आनंदी दिसत असून दिशाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो दिसत आहे. तसेच अभिनेत्रीचे बेबी बंपदेखील दिसून येत आहेत. 

सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव

राहुल वैद्य आणि दिशा परमारचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मौनी रॉय, जस्मीन भसीन, वरुण सूद, अनीता हसनंदानी, अली गोनीसह अनेक सेलिब्रिटींनी राहुल आणि दिशाला शुभेच्छा दिल्या आहेत.

राहुल वैद्य आणि दिशा परमार 16 जुलै 2021 साली लग्नबंधनात अडकले. विशेष म्हणजे राहुलने 'बिग बॉस 14'च्या (Bigg Boss) घरात दिशाला प्रपोज केलं होतं. सोशल मीडियावर राहुल आणि दिशा एकमेकांसोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर करत असतात. राहुल 'बिग बॉस 14' आणि 'खतरों के खिलाडी 11'मध्ये दिसून आला आहे. दर दिशा 'बडे अच्छे लगते है 2'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचली आहे. 

संबंधित बातम्या

Rahul Disha Wedding Photos: टेलिव्हिजन स्टार राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या विवाहाचे फोटो पाहिले का?

महत्त्वाच्या बातम्या

Preity Zinta on Tukaram Mundhe: प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...
प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...
Singer Parmish Verma Divorce: बादशाहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट; 5 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम, गर्लफ्रेंड कोण?
बादशाहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट; 5 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम, गर्लफ्रेंड कोण?
Mirzapur the movie box : 'मिर्झापूर: द मुव्ही'चा भौकाल; 3 दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला, रविवारी किती कमावले?
'मिर्झापूर: द मुव्ही'चा भौकाल; 3 दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला, रविवारी किती कमावले?
Kangana Ranauts Janmashtami: कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर
कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget