अंगावर खाकी वर्दी, डोळ्यावर गॉगल, शाहरुख खानच्या नव्या पोस्टरची चर्चा, रुबाब पाहून अनेक तर्कवितर्कांना उधाण!
Shah Rukh Khan : शाहरुख खान सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोला पाहून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खानला वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्याचा आगामी चित्रपट कधी येतो, याची त्याच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. त्याचा लवकरच किंग नावाचा चित्रपट येणार आहे. या चित्रपटावर काम चूल झालेले आहे. असे असतानाच आता शाहरुख खानचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून शाहरुख खान आता नेमका कोणत्या भूमिकेत दिसणार? तसेच तो आता त्याच्या चाहत्यांसाठी नेमकं काय नवं घेऊन येत आहे? असे विचारले जात आहे.
पोलिसांच्या गणवेशातील शाहरुख व्हायरल
सध्या शाहरुख खानचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये शाहरूख पोलिसांच्या कपड्यात दिसतोय. अंगावर वर्दी असल्यामुळे त्याचा रुपाब काही वेगळाच दिसतोय. हे पोस्टर पाहून आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. एका फोटोमध्ये शाहरुख खान चक्क बाईकवर बसल्याचे दिसतेय. या फोटोत शाहरुख खानच्या डोळ्यांवर गॉगल आहे. त्यामुळे आता शाहरुख खानच्या फोटोचा नेमका अर्थ काय? असे विचारले जात आहे.
View this post on Instagram
शहरुखचा फोटो पाहून तर्कवितर्कांना उधाण
शाहरुख खानचा वर्दीतला फोटो पाहून त्याचा आगामी प्रोजेक्ट नेमका काय आहे? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. हा फोटो समोर येताच. लोकांनी अनेक तर्कवितकर्क लावले आहेत. काही जण शाहरुख खान एका जाहिरातीत काम करणार आहे, त्याचा जाहिरातीच्या प्रसिद्धीसाठी हा फोटो काढण्यात आला आहे, असे म्हटले जात आहे. तर काही लोकांनी शाहरुख खान आगामी चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसू शकतो, असं अंदाज लावला जात आहे.
शाहरुखचे कोणते चित्रपट प्रदर्शित झाले?
दरम्यान, शाहरुखचा याआधी डंकी हा चित्रपट येऊन गेला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चालला. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य नायिकेच्या भूमिकेत होती. सोबतच या चित्रपटात विकी कौशल हादेखील होता. या चित्रपटाच्या अगोदर शाहरुख खानचा जवान हा चित्रपट आला होता. या चित्रपटाने मात्र बॉक्स ऑफिसवर चांगालच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील बरेच विक्रम मोडीत काढले होते.
शाहरुख खानचा किंग चित्रपट येणार
शाहरुखचा आता किंग नावाचा चित्रपट येत आहे. या चित्रपटात त्याची मुलगी सुहाना खान हिदेखील दिसणार आहे. या चित्रपटात बाल-लेकीची जोडी पाहायला मिळेल. त्यामुळेच या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. किंग चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन हादेखील असेल, असे म्हटले जात आहे. 2025 मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असून तो 2026 साली प्रदर्शित केला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
सलग 58 तास एकमेकांना किस, बनवून टाकलं वर्ल्ड रेकॉर्ड, आता त्याच कपलने घेतला घटस्फोट!























