एक्स्प्लोर

Happy Birthday Dilip Joshi : शाहरुख-सलमानसोबत काम केलेला दिलीप जोशी कसा झाला टीव्हीचा 'कॉमेडी किंग'? जाणून घ्या जेठालालबद्दलच्या खास गोष्टी

Dilip Joshi Birthday : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता दिलीप जोशीचा आज वाढदिवस आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेआधी त्याने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे.

Dilip Joshi : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. आजही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दिलीप जोशी जेठालाल गढा ही भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला आहे. दिलीप जोशी आज आपला 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. दिलीप जोशी यांनी 90 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

दिलीप जोशीचा जन्म 26 मे 1968 रोजी एका गुजराती कुटुंबात झाला आहे. दिलीप बीसीए करत असताना त्याला इंडियन नॅशनल थिएटरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. दिलीप जोशी 1995 ते 1990 पर्यंत एका ट्रॅवेल एजेंसीचे सह-संस्थापक होते. दिलीप जोशीने जयमाला नामक महिलेसोबत लग्न केलं होतं.  

दिलीप जोशीचा सिनेप्रवास (Dilip Joshi Movies)

दिलीप जोशीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पण चांगले काम न मिळत असल्याने तो एका ट्रॅवेल एजंसीसोबत जोडला गेला. दिलीप जोशीने सूरज बडजात्याच्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटात रामू नामक नोकराची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी काही गुजराती नाटकांमध्येही काम केलं. दिलीप जोशीने 'हम आपके है कौन','दिल है तुम्हारा','वन टू का 4','खिलाडी 420','फिर भी दिल है हिंदुस्तानी' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. दिलीप जोशी 90 च्या दशकापासून टिव्ही विश्वासोबत जोडले गेले होते. 

दिलीप जोशीने गाजवलाय छोटा पडदा

दिलीप जोशीने हम सब बराती, शुभ मंगल सावधान, कभी ये कभी वो, दो और दो पांच, क्या बात है, एफआईआर, हम सब एक है आणि तारक मेहता का उल्टा चष्मा या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम केलं आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका 2008 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आज 2024 मध्येही या मालिकेचं प्रसारण सुरू आहे. दिलीप जोशीच्या कॉमेडी टायमिंगचं कौतुक होतं. तसेच त्याला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. 

दिलीप जोशीची नेटवर्थ (Dilip Joshi Networth)

दिलीप जोशीने ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यावेळी त्याला 50 रुपये मानधन मिळालं होतं. पुढे त्याला कामे मिळू लागली. आज एका एपिसोडसाठी दिलीप जोशी एक लाख रुपयांचं मानधन घेतो. मीडिया रिपोर्टनुसार, दिलीप जोशीची एकूण संपत्ती 45 ते 50 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

संबंधित बातम्या

TMKOC Jethalal Dilip Joshi : 'तारक मेहता...'च्या सेटवर झाला होता राडा; सेटवरच 'जेठालाल'वर फेकली होती खुर्ची!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar Bag Checking : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचया बॅगची प्रशासनाकडून तपासणीAvinash Pandey on CM Post : मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? अविनाश पांडेंचं मोठं वक्तव्यManda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabhaSharad pawar Baramati : युगेंद्र पवराांसाठी शरद पवारांची सभा, मंचावर जोरदार स्वागत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
Embed widget