Kacha Badam : युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री थिरकली 'कच्चा बदाम'वर, इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ
Kacha Badam Song : युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री 'कच्चा बदाम' गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

Dhanashree Verma : सोशल मीडियावर सध्या 'कच्चा बदाम' (kacha badam) गाण्याने धुमाकूळ घातला आहे. सर्वसामान्यांपासून बड्या सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण 'कच्चा बदाम'वर थिरकताना दिसत आहेत. या गाण्यावर भन्नाट रिल्स आणि व्हिडीओदेखील बनत आहेत. आता क्रिकेटर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीदेखील 'कच्चा बदाम' गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
धनश्रीने 'कच्चा बदाम' गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धनश्री तिच्या आईसोबत डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत तिने 'माझी व्हॅलेंटाईन' अशी कॅप्शनदेखील लिहिली आहे.
तिचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
View this post on Instagram
'कच्चा बदाम' गाण्याचा इतिहास काय आहे?
एका शेंगदाणे विक्रेत्याने शेंगदाणे विकताना 'बदाम... बदाम... कच्चा बदाम' या ओळींचा वापर केला. भुवन बडायकर असे या शेंगदाणा विक्रेत्याचे नाव आहे. भुवन बडायकर हे पश्चिम बंगालमधील कुरलजुरी या गावचे रहिवासी आहेत. पश्चिम बंगालमध्ये बदामाला 'कच्चा बदाम' म्हणतात. पश्चिम बंगालमध्ये 'कच्चा बदाम' म्हणतात. भुवन शेंगदाणे विकताना 'बदाम... बदाम... कच्चा बदाम' असं त्याच्या शैलीमध्ये गायचा. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी यावर रिल्स आणि व्हिडीओही बनवले. त्यानंतर या गाण्याचं आता रॅप वर्जनमध्ये गाणं आलं आहे. तेही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे.
संबंधित बातम्या
Love Hostel Trailer : शाहरुख खान निर्मित 'लव हॉस्टल' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, बॉबी देओल, सान्या मल्होत्रासह विक्रांत मेस्सी सारखी तगडी स्टारकास्ट
Amruta Fadnavis : 'व्हॅलेंटाईन डे'ला अमृता फडणवीसांचा नवा 'अवतार'; फोटो शेअर करत केली नव्या गाण्याची घोषणा
Pushpa : पुष्पाची क्रेझ, औरंगाबादमधील तरुणाने साकारला अल्लू अर्जुनचा भन्नाट पुतळा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
