![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Devara New Release Date : ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'ची रिलीज डेट ढकलली पुढे; आता 'या' दिवशी होणार रिलीज
Devara New Release Date : टॉलिवूड सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या आगामी पॅन इंडिया 'देवरा' या सिनेमाची रिलीज डेट आता पुढे ढकलण्यात आली आहे.
![Devara New Release Date : ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'ची रिलीज डेट ढकलली पुढे; आता 'या' दिवशी होणार रिलीज Devara New Release Date JR NTR Devara gets New Release Date now will hit cinemas on 10th April Know Bollywood Entertainment Latest Update Marathi News Devara New Release Date : ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'ची रिलीज डेट ढकलली पुढे; आता 'या' दिवशी होणार रिलीज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/16/e4f16ea27b7b00160ceae6f6d6eb976c1708107123198254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Devara New Release Date : टॉलिवूड सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (JR NTR) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) अभिनीत 'देवरा' (Devara) या सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. कोरताला शिवाने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. घोषणा झाल्यापासून सिनेप्रेमी या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अशातच आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचं समोर आलं आहे.
'आरआरआर' (RRR) सुपरहिट झाल्यानंतर ज्युनियर एनटीआर त्याच्या आगामी 'देवरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याच्या या आगामी सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शन ड्रामा पाहायला मिळणार आहे. 'देवरा' हा पॅन इंडिया सिनेमा आहे.
'देवरा' हा सिनेमा आधी 5 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. अशातच आता निर्मात्यांनी या सिनेमाच्या रिलीज डेटमध्ये बदल केला आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट बददली असल्याची घोषणा केली आहे. 'देवरा' हा सिनेमा आता 10 एप्रिल 2024 रोजी रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
'देवरा' कधी रिलीज होणार? (Devara New Relaese Date)
कोरताला शिवा दिग्दर्शित देवरा या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 300 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. दोन भागांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. पहिला भाग 10 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होईल. तेलुगू, तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.
युवासुधा आर्ट्स आणि एनटीआर आर्ट्सच्या बॅनरअंतर्गत 'देवरा' या सिनेमाची निर्मिती होत आहे. अनिरुद्ध रविचंदरने या सिनेमाला संगीत दिलं आहे. देवरा हा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाच्या वीएफएक्सवर 140 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ज्युनियर एनटीआरच्या या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. टॉलिवूड सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या आगामी पॅन इंडिया 'देवरा' या सिनेमाची रिलीज डेट आता पुढे ढकलण्यात आली असल्याने चाहते मात्र नाराज झाले आहेत.
ज्युनिअर एनटीआरने 'वॉर 2' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात तो हृतिक रोशनसोबत झळकला. लवकरच या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत ज्युनिअर एनटीआरचा समावेश आहे.
संबंधित बातम्या
Devara Teaser Out : ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'चा टीझर आऊट; अभिनेत्याच्या दबंग अंदाजाने जिंकले चाहत्यांचे मन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)