एक्स्प्लोर
...तर करण जोहरला पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते!
नोटीसमध्ये सगळ्यांकडून दहा दिवसात उत्तर मागितलं आहे. अन्यथा दिल्लीचं आरोग्य विभाग त्यांच्याविरोधात केस दाखल करेल.
मुंबई : निर्माता दिग्दर्शक करण जोहरला पाच वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. त्याच्यावर कोटपा कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
करण जोहर आणि रोहित शेट्टी 'स्टार प्लस'वरील चर्चित रिअॅलिटी शो 'इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स'चे जज आहेत. पण या शोमध्ये दाखवली जाणारी कमला पसंद पान मसाल्याची जाहिरात चॅनलच्या मालकांसह धर्मा प्रॉडक्शन, अँडमोल प्रॉडक्शन कंपनी, कमला पसंद कंपनीसाठी अडचणीचं कारण ठरु शकते.
दिल्ली आरोग्य विभागाची नोटीस
सिगरेट अँड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स अॅक्ट (कोटपा) 2003 नुसार या सगळ्यांना दिल्लीच्या आरोग्य विभागाने नोटीस जारी केली आहे. करण जोहर आणि रोहित शेट्टी या शोचे जज आहेत. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला धर्मा प्रॉडक्शनचं नाव येतं. त्यामुळे त्यांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणात कोटपा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी करणला दुसऱ्यांदा नोटीस पाठवण्यात आली आहे. यात दोषी आढळल्यास त्याला 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दोन हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.
कार्यक्रमाविरोधात दुसरी नोटीस
या कार्यक्रमाशी संबंधित सगळ्यांना 'सेरोगेटेड अॅड' दाखवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. नोटीसमध्ये सगळ्यांकडून दहा दिवसात उत्तर मागितलं आहे. अन्यथा दिल्लीचं आरोग्य विभाग त्यांच्याविरोधात केस दाखल करेल.
'इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स' हा कार्यक्रम बहुतांश तरुण वर्ग पाहतो. या रिअॅलिटी शोमध्ये कमला पसंदचं प्रमोशन केलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement