Deepika Padukone : आई होताच अभिनेत्री दीपिकाच्या आयुष्यात 'ही' गोष्ट बदलली, नेटकरी म्हणाले Perfect Mother
Deepika Padukone Daughter : अभिनेत्री दीपिका पदुकोण आई झाल्यानंतर तिच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलणार आहेत आणि त्याची सुरुवातही झाली आहे. अभिनेत्रीने तिचा इंस्टाग्राम बायो बदलला आहे.
![Deepika Padukone : आई होताच अभिनेत्री दीपिकाच्या आयुष्यात 'ही' गोष्ट बदलली, नेटकरी म्हणाले Perfect Mother Deepika Padukone changes Insta Bio after Daughter Birts shares change in lifestyle ranveer singh baby marathi news Deepika Padukone : आई होताच अभिनेत्री दीपिकाच्या आयुष्यात 'ही' गोष्ट बदलली, नेटकरी म्हणाले Perfect Mother](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/16/df45d025df0a22d1d35bc451c473b1781726488887245322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Deepika Padukone Newborn Baby : बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोणला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ती चिमुकलीसह घरी परतली आहे. गणेशोत्सावादरम्यान दीपिका पदुकोणनं गूड न्यूज दिली. काही दिवसांपूर्वीच दीपिकानं गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह आई-बाबा झाले आहेत. आई झाल्यानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलणार आहेत आणि त्याची सुरुवातही झाली आहे. अभिनेत्रीने तिचा इंस्टाग्राम बायो बदलला आहे.
आई होताच दीपिकाच्या आयुष्यात 'ही' गोष्ट बदलली
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी त्यांच्या घरी आलेल्या लक्ष्मी गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. 8 सप्टेंबर रोजी दीपिका पदुकोणनं चिमुकल्या परीला जन्म दिला. सोशल मीडियावर कपलने याची अधिकृत घोषणा केली. इंस्टाग्राम पोस्टमध् दीपिकाने लिहिलं होतं की, 'वेलकम बेबी गर्ल, 8.9.2024, दीपिका आणि रणवीर.' आता दीपिका पदुकोण हॉस्पिटलमधून घरी परतली आहे आणि तिने सर्वप्रथम तिचा इंस्टाग्राम बायो बदलला आहे. दीपिकाने इंस्टाग्रामवरील 'Follow your blis' हा जुना बायो बदलला आहे.
इंस्टाग्रामवर बायो बदलला
आई झाल्यानंतर दीपिका पदुकोणने तिचा इंस्टाग्राम बायो बदलला आहे. दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये लिहिले, 'फीड, बर्प, स्लीप, रिपीट' (Feed. Burp. Sleep. Repeat.) काही दिवसांपूर्वीच, दीपिका आणि रणवीरने इंस्टाग्रामवर मॅटर्निटी फोटोशूट शेअर करून त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. रणवीर आणि दीपिकाचे लग्न नोव्हेंबर 2018 मध्ये झालं होतं. लग्नाच्या सहा वर्षांनंतर त्यांचं कुटुंब दोनपासून तीन झालं आहे.
फीड, बर्प, स्लीप, रिपीट
![Deepika Padukone : आई होताच अभिनेत्री दीपिकाच्या आयुष्यात 'ही' गोष्ट बदलली, नेटकरी म्हणाले Perfect Mother](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/16/5eae21e4c71b241a45b3320ede42a01f1726488417735322_original.jpeg)
अभिनेत्री दीपिका पदुकोणला रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी मुंबईतील गिरगाव परिसरातील एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या परिसरातून बाहेर पडलेल्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. मीडियाच्या कॅमेऱ्यांना टाळत स्टार कपल रुग्णालयाच्या मागच्या गेटमधून बाहेर पडले. व्हायरल व्हिडीओमध्ये, दीपिका आणि तिचा पती रणवीर त्यांच्या मर्सिडीज-मेबॅक कारमधून हॉस्पिटलच्या गेटमधून बाहेर पडत असताना नवजात बाळाची झलकही दिसली.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Bigg Boss Marathi : घराबाहेर पडल्यावर निक्कीच्या आईला आर्या थेटच म्हणाली, “तुमची मुलगी...”
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)