एक्स्प्लोर

8 तासांच्या शिफ्टच्या मागणीमुळे 2 चित्रपट हातातून गेले, दीपिकानं इंडस्ट्रीतील ढोंगीपणावर प्रश्न उगारले, म्हणाली, अनेक पुरुष कलाकार..

8 तासांच्या शिफ्टच्या मागणीमुळे 2 चित्रपट हातातून गेले, दीपिकानं इंडस्ट्रीतील ढोंगीपणावर प्रश्न उगारले, म्हणाली, अनेक पुरुष कलाकार..

Deepika Padukone: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण मागील काही काळ वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. तिच्या आठ तासांच्या शिफ्टची डिमांड आणि जास्त पैसे मागण्याच्या कारणास्तव तिला साउथच्या दोन मोठ्या चित्रपटांमधून 'स्पिरिट' आणि 'कल्कि 2' मधून बाहेर काढल्याचे समजते. या प्रकरणामुळे दीपिकावर अनेक आरोप झाले आणि 'अनप्रोफेशनल' असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले. आता या सगळ्या गोष्टींवर दीपिकानं आपलं स्पष्ट मत मांडलय. (Bollywood News)

Deepika on 8 hours Shift: आठ तासांच्या शिफ्टविषयी दीपिकाचे मत

बऱ्याच काळानंतर, अभिनेत्रीने तिच्यावरील सर्व आरोपांवर मौन सोडले आहे. CNN-TV18 सोबत बोलताना या सर्व आरोपांवर आपली मते व्यक्त केली. तिने इंडस्ट्रीतील ढोंगीपणावर लक्ष वेधलं. ती म्हणाली, "एक स्त्री म्हणून जर यामुळे दबाव आल्यासारखे वाटत असेल, तर तसेच होऊ द्या. पण हे काहीतरी नवीन नाही की भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक सुपरस्टार, पुरुष कलाकार, अनेक वर्षे फक्त आठ तास काम करत आहेत आणि त्यामुळे ते कधीही बातम्यांच्या मथळ्यामध्ये  दिसले नाहीत.

तिने पुढे सांगितले की, "मी सध्या कुणाचं नाव घेऊ इच्छित नाही आणि ह्या प्रकरणाला मला इतकं मोठं बनवायचं नाही. पण अनेक पुरुष कलाकार सोमवार ते शुक्रवार फक्त आठ तास काम करतात, वीकेंडला काम करत नाहीत. भारतीय फिल्म इंडस्ट्रीला 'इंडस्ट्री' म्हणतात, पण खरी परिस्थिती खूप अव्यवस्थित आहे. आता वेळ आली आहे की योग्य व्यवस्थापन आणि स्ट्रक्चर आणले पाहिजे."

Deepika Padukon:दीपिका वादाच्या भोवऱ्यात का?

दीपिकाच्या आठ तासांच्या शिफ्ट डिमांडचा वाद संदीप रेड्डी वांगाच्या 'स्पिरिट' प्रोजेक्टदरम्यान सुरू झाला होता. असं सांगितलं जातंय की दीपिका आपल्या लेकीला दुआच्या संगोपनासाठी अशा अटी मागत होती. या मागण्या प्रोड्युसर्सना मान्य करणे शक्य झाले नाही. दीपिकाने या संदर्भात खुलासा करत म्हटले की, अनेक महिला कलाकार, जे मातृत्वानंतरही काम करतात, त्याही आठ तास काम करतात; पण फक्त त्यांच्या बाबतीतच वाद निर्माण केला जातो.

तिने सांगितले, "मी नेहमीच माझ्या लढाया शांतपणे लढत आले आहे. पैशांच्या बाबतीत देखील मला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी सामना करावा लागला. काही विचित्र  कारणास्तव काही प्रकरणे सार्वजनिक होतात, जी मला कळत नाहीत किंवा मला असे शिकवलेही गेले नाही. पण हो, शांतपणे आणि आदराने माझे लढाया लढणे हा माझा मार्ग आहे."

प्रोजेक्ट्स आणि भविष्यातील प्रोजेक्ट 

'स्पिरिट' आणि 'कल्कि 2' पासून बाहेर पडली तरी दीपिका सध्या दोन मोठ्या प्रोजेक्ट्सचा भाग आहे. ती शाहरुख खानच्या 'किंग'मध्ये दिसणार आहे, तर अल्लू अर्जुन-एटलीच्या पॅन इंडिया अनटायटल्ड चित्रपटातही झळकणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MCA Election : ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत; शरद पवारांना फोन, जय शाहांची मदत हवी
ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत; शरद पवारांना फोन, जय शाहांची मदत हवी
Uddhav Thackeray on Ajit Pawar: अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
मंत्री नितेश राणेंचं ते वक्तव्य व्यक्तिगत, भाजपचा संबंध नाही; अल्पसंख्यांक आयोग नोटीस पाठवण्याच्या तयारीत
मंत्री नितेश राणेंचं ते वक्तव्य व्यक्तिगत, भाजपचा संबंध नाही; अल्पसंख्यांक आयोग नोटीस पाठवण्याच्या तयारीत
Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rupali Thombre : 'माझ्याविरोधात कट रचला, पुरावे Rupali Chakankar यांना पाठवले होते', मोठा गौप्यस्फोट
Uddhav Thackeray PC : कुबड्या फेकण्याची या सरकारमध्ये हिम्मत नाही - उद्धव ठाकरे
Maharashtra Politics: '...युती झाली तर संबंध तोडू', Narayan Rane यांचा थेट इशारा, Konkan मध्ये राजकीय भूकंप
Uddhav's Jibe: 'मोदी-शहांना Ahmedabad चे महापौर करा, मगच Karnavati नाव बदलेल', उद्धव ठाकरेंचा टोला
Maha Land Scam: 'भारतमातेला लुटणाऱ्यांना वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार नाही', उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MCA Election : ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत; शरद पवारांना फोन, जय शाहांची मदत हवी
ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत; शरद पवारांना फोन, जय शाहांची मदत हवी
Uddhav Thackeray on Ajit Pawar: अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
मंत्री नितेश राणेंचं ते वक्तव्य व्यक्तिगत, भाजपचा संबंध नाही; अल्पसंख्यांक आयोग नोटीस पाठवण्याच्या तयारीत
मंत्री नितेश राणेंचं ते वक्तव्य व्यक्तिगत, भाजपचा संबंध नाही; अल्पसंख्यांक आयोग नोटीस पाठवण्याच्या तयारीत
Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नाहीतर बॅलेट पेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नाहीतर बॅलेट पेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Embed widget