एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या 5 सिनेमांच्या यादीत 'दंगल'चा समावेश
मुंबई : अभिनेता आमिर खानच्या दंगल सिनेमा जगभरात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. इंग्रजी चित्रपटाव्यतीरिक्त जगभरात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या पाच चित्रपटांमध्ये दंगलचा समावेश झाला आहे.
चीनमधील चित्रपटगृहांमध्ये 'दंगल' सिनेमा 5 मे रोजी रिलीज झाला. त्यानंतर दंगलच्या कमाईचा आकडा तब्बल 301 मिलिअन डॉलर्स म्हणजे जवळपास 1932 कोटींवर पोहचला.
चित्रपटांच्या जागतिक कमाईचा दंगलने केलेला हा रेकॉर्ड आत्तापर्यंत फक्त पाच चित्रपटांनी केला असून दंगल पाचव्या स्थानावर आहे. हॉलिवूडचे चित्रपट कमाई करण्यात नेहमीच पुढे असतात. पण फार कमी वेळा इंग्रजी भाषेत नसणारे चित्रपट इतकी मोठी कमाई करतात. त्यात दंगलने स्थान मिळवल्यानं दंगलच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला आहे असच म्हणावं लागेल.
दुसरी़कडे भारतीय चित्रपटगृहांमध्ये दंगलची मोठी क्रेझ पाहायला मिळाली. या सिनेमाने रिलीजनंतर आधीचे कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दंगलने बॉक्स ऑफिसवर रिलीजनंतर दोनच दिवसात 320.16 कोटींचा गल्ला जमवला होता.
दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग यांनी दंगल सिनेमा चीनमध्ये चांगली कमाई करत असल्याचं पंतप्रधान मोदींना सांगितलं. तसेच चीनच्या राष्ट्रधयक्षांनी तो स्वतः हा पाहिला आणि त्यांना तो आवडल्याची माहिती परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी दिली.
संबंधित बातम्या
'दंगल' आवडला, चीनच्या राष्ट्रपतींची मोदींकडे प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement