(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Drug Case: आर्यन खानच्या अटकेनंतर बॉलिवूड कलाकारांचा शाहरूखला पाठिंबा
बॉलिवूडमधील काही कलाकारांनी शाहरूखला पाठिंबा दिला आहे. पाहूयात कोणते कलाकार शाहरूखला सपोर्ट करत आहेत.
मुंबई- मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीतून अटक केलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना NCB कोठडी सुनावणावली होती. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियवर या ड्रग्स प्रकरणाबद्दल आपली मतं मांडली. बॉलिवूडमधील काही कलाकारांनी शाहरूखला पाठिंबा दिला आहे. पाहूयात कोणते कलाकार शाहरूखला सपोर्ट करत आहेत.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भटने सोशल मीडियावर ट्विट केले, 'शाहरूख मी तुझ्यासोबत आहे. असं नाहिये की तुला याची गरज आहे, पण मी तुझ्या पाठिशी आहे. ही वेळ पण निघून जाईल '
अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ति (suchitra krishnamoorthi) यांनी ट्विट करत लिहीले, 'आई वडिलांना त्यांच्या मुलांना काळजीत पाहणे खूप अवघड आहे. मी प्रार्थना करत आहे.' तसेच सुचित्राने अजून एका ट्विटमध्ये लिहीले, 'बॉलिवूडवर निशाणा साधणाऱ्यांनासाठी, चित्रपटांमधील कलाकारांवर टाकण्यात आलेले एनसीबीचे छापे आठवत आहेत का? काहीच नाही मिळालं आणि काही साध्य देखील नाही झाल. हा एक तमाशा आहे. '
शाहरूखचा जुना आणि जवळचा मित्र सलमान खानने शाहरूखची भेट घेऊन त्याचे सांत्वन केले. सलमानने याबद्दल सोशल मीडियावर कोणतेही मत मांडले नाही.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध सुनील शेट्टी (Suniel Shetty) ने देखील शाहरूखला पाठिंबा देत ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये लिहीले, 'जेव्हा एका ठिकाणी रेड होते. तेव्हा तिकडे बरेच लोक असतात. आपण असे समजतो की या मुलाने ड्रग्स घेतले असतील. मला वाटतं की अजून तपास सुरू आहे. त्यामुळे त्या मुलाला थोडा वेळ श्वास घ्यायला तरी वेळ दिला पाहिजे. जेव्हा आमच्या क्षेत्रामध्ये काही घडते तेव्हा मीडिया खूप तुटूण पडते.'
क्रूझवरच्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक केल्यानंतर न्यायालयानं आर्यन खानसह तिघांना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली होती. ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे आर्यन खानची बाजू न्यायालयात मांडतील. आर्यन खानचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी सांगितले होते की, आर्यन खानला क्रूझवर आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी आमंत्रित केले होते.
कस्टोडियल अर्जात एनसीबीने म्हटले होते की, "एनसीबीने केलेल्या प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की व्हॉट्सअॅप चॅटच्या स्वरूपात गुन्ह्यात सहभाग दर्शवणारे साहित्य आहे, यात स्पष्ट झाले आहे की, अटक केलेले आरोपी (आर्यन खान आणि इतर दोन) ड्रग्ज पुरवठादार आणि तस्करांशी त्यांचे नियमित संबंध होते.