एक्स्प्लोर

NCB Raid : कारवाईनंतर 'त्या' अभिनेत्याच्या मुलगा म्हणाला, 'मला व्हिआयपी गेस्ट म्हणून बोलवलेलं' तर अधिकारी म्हणतात...

Mumbai NCB Raid LIVE Update: एनसीबीनं (NCB) काल रात्री एका क्रुझवर छापा मारत बॉलिवूडमधील एका बड्या अभिनेत्याच्या मुलासह दहा लोकांना ताब्यात घेतलं आहे.

Mumbai NCB Raid LIVE Update: मुंबईतील ड्रग्ज रॅकेट्स (drugs case) काही कमी होण्याचं नाव घेत नाहीय. आता एनसीबीनं (NCB) काल रात्री एका क्रुझवर छापा मारत बॉलिवूडमधील एका बड्या अभिनेत्याच्या मुलासह दहा लोकांना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्रूझ टर्मिनलवरुन एक क्रूझ लक्ष्यद्वीपकडे जाणार होती. ज्यात एनसीबी अधिकाऱ्यांकडून छापा टाकण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हाती लागले असल्याची माहिती आहे. या क्रूझवर एक रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. दरम्यान एनसीबी अधिकारी समीर वानखेडे काही जणांना घेऊन एनसीबी कार्यालयात दाखल झाले असल्याची माहिती आहे.

एनसीबी सूत्रांनी सांगितलं की, त्या बड्या अभिनेत्याच्या मुलानं चौकशी दरम्यान सांगितलं की, त्याला व्हिआयपी गेस्ट म्हणून तिथं बोलवलं होतं. त्याच्याकडून क्रुझवर येण्यासाठी कुठलीही फी घेतली नव्हती. त्यानं म्हटलं आहे की, माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलावलं गेलं. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या लोकांची आज चौकशी होणार आहे. अद्याप कुणाला अटक केलेलं नसल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे. आज चौकशीदरम्यान नेमकी काय माहिती समोर येतेय याकडे लक्ष लागून आहे. सोबतच त्या बड्या अभिनेत्याच्या मुलाला अटक केली जाईल का? हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. 

क्रुझवर कसं पोहोचलं ड्रग्ज

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांनी आपल्या पॅंट, अंडरवेअर, कॉलरच्या सिलाईमध्ये तसंच महिलांनी आपल्या पर्सच्या हॅंडलमध्ये लपवून आणलं होतं. 

मुंबई विमानतळावरुन 5 कोटींचं ड्रग्ज जप्त, NCBची कारवाई, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला ड्रग्ज पाठवलं जात असल्याची   

त्यानंतर अधिकाऱ्यांनी या क्रूझवर छापा मारत दहाहून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, काही जणांची रात्रीत चौकशी केल्यानंतर सोडून देण्यात आले. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या 8 ते 10 जणांपैकी एक जण बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्याचा मुलगा देखील असल्याची माहिती आहे. यात काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जरी असलं तरी आज कुणालाही कोर्टात हजर केलं जाणार नसल्याचं एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे. सोबतच कोणालाही अटक केली नसून तपास सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या चौकशीत काय माहिती पुढे येते आणि बड्या अभिनेत्याच्या मुलाला अटक केली जाते का? हे पाहाणं महत्त्वाचे असणार आहे. सोबतच आणखी एका अभिनेत्याची मुलगी देखील यात असल्याची माहिती देखील समोर आली आहे. 

NCB Drug Arrest :1 कोटींचे ड्रग्ज जप्त, 5 पेडलर्सना बेड्या, भायखळा, रे रोड, बलार्ड पिअर भागात कारवाई

आठ तासांहून अधिक वेळ कारवाई
ही कारवाई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या टीमकडून करण्यात आली. आठ तासांहून अधिक वेळ क्रुझवर कारवाई सुरु होती. सूत्रांनी सांगितलं की, ही क्रुझ मुंबईवरुन गोव्याला चालली होती. जशी ही क्रुझ मुंबईवरुन निघाली तशी ड्रग्ज पार्टी सुरु झाली. एनसीबीची टीम आधीपासूनच क्रुझवर होती. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळाल्यानंतर क्रुझ मुंबईकडे वळवण्यात आली. 

या छाप्यामध्ये बड्या अभिनेत्यांच्या मुलांची नाव समोर येत असल्यानं छाप्यादरम्यान सर्व एनसीबीच्या टीमच्या कर्मचाऱ्यांचे फोन बंद करण्यात आले. छापेमारीची कारवाई पूर्ण होईपर्यंत त्यांचे फोन बंद होते.  

महत्त्वाच्या बातम्या

कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget