(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | बॉलिवूड निर्माता करीम मोरानीच्या दुसऱ्या मुलीलाही कोरोनाची लागण!
विशेष म्हणजे करीम मोरानीच्या दोन्ही मुलींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. परंतु जोयाची अहवाल निगेटिव्ह आला. तर शजा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. नंतर केलेल्या तपासणी जोया कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं.
मुंबई : एकीकडे बॉलिवूड गायिका कनिका कपूरचा सहावा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे, दुसरीकडे मात्र काल म्हणजेच 6 एप्रिलला बॉलिवूडला आणखी दोन झटके बसले. प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि शाहरुख खानचा निकटवर्ती करीम मोरानीच्या दुसऱ्या मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्याआधी करीम मोरानीच्या शजा मोरानी कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यांनतर त्याची दुसरी मुलगी अभिनेत्री झोया मोरानीलाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.
खासगी रुग्णालयात दोन्ही बहिणींवर उपचार कोरोनाची लक्षणं आढळल्याने करीम मोरानीची दुसरी मुलगी आणि अभिनेत्री झोया मोरानीला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जोयाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून आयसोलेशन आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. शजा मोरानी नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. "शजा मार्चच्या सुरुवातीला श्रीलंकेहून परतली होती. तर झोया मार्च महिन्याच्या मध्यात राजस्थानहून परतली होती. माझ्या दोन्ही मुलींनी या संदर्भात अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती दिली होती," असं करीम मोरानी यांनी सांगितलं.
जोयाचा पहिला अहवाल निगेटिव्ह विशेष म्हणजे करीम मोरानीच्या दोन्ही मुलींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. परंतु जोयाचा अहवाल निगेटिव्ह आला. तर शजा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. यानतर रविवारी (5 एप्रिल) संध्याकाळी तिला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. "शजामध्ये आठवडाभर कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसली नाहीत, ती पूर्णत: बरी होती. पण मोठी मुलगी झोयामध्ये कोरोनाची लक्षणं होती, तरीही तिचा अहवाल निगेटिव्ह आला. तिची पुन्हा तपासणी केली. सध्या दोघीही आयसोलेशन आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत," असं करीम मोरानीने सांगितलं.
करीम मोरानी राहत असलेली इमारत सील करीम मोरानीचं कुटुंब ज्या इमारतीत राहतं ती सील करण्यात आली आहे. जवळपासच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ज्या परिसरात करीम मोरानीचं कुटुंब राहतं, तिथे अनेक कलाकार राहतात. कोरोना व्हायरसची लागण झालेली जोया ही बॉलिवूडमधील तिसरी व्यक्ती आहे. याआधी तिची बहिण शजा मोरानी आणि बॉलिवूड गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली होती.
अनेक वेब सीरिजमध्ये जोआ मोरानीचं काम अभिनेता शाहरुख खानने झोया मोरानीला 2011 मध्ये आलेल्या 'ऑल्वेज कभी कभी' चित्रपटातून लॉन्च केलं होतं. या चित्रपटात तिच्यासोबत अली फजल आणि सत्यजीत दुबे मुख्य भूमिकेत होते. 'भूतपूर्व' या वेब सीरिजमध्ये ती शेवटची झळकली होती. याशिवाय तिने मस्तान, भाग जॉनी भाग, अखूरी यांसाख्या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. जोया मोरानी 'ओम शांती ओम' आणि 'हल्ला बोल' या चित्रपटांची असिस्टंट डायरेक्टर देखील होती.
कनिका कपूर-कोरोनाची लागण झालेली बॉलिवूडमधील पहिली व्यक्ती गायिका कनिका कपूर ही बॉलिवूडमधील पहिली व्यक्ती होती, जी कोरोना पॉझिटिव्ह होती. कनिका कपूर होळीच्या आधी लंडनहून मुंबईला परतली होती. यानंतर ती लखनौला गेली आणि तिथे अनेक लोकांसोबत पार्टीही केली. तब्येत बिघडल्यानंतर तिने तपासणी केली असता, COVID-19 पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या सगळेच दहशतीत होते. कनिका कपूरच्या निष्काळजी आणि बेजबाबदारपणामुळे उत्तर प्रदेशात तिच्याविरोधात गुन्ह्याची नोंद देखील झाली.
भारतातील कोरोनाबाधितांची आकडेवारी भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 4281 झाली असून 100 हून अधिकांचा मृत्यू झाला आहे. तर 319 रुग्ण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांमध्ये 76 टक्के पुरुष आणि 24 टक्के महिला आहेत.