(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tom Cruise's Space Film : Tom Cruise's Space Film :आता अंतराळात होणार टॉम क्रूझच्या आगामी सिनेमाचे शूटिंग
Space Entertainment Enterprise : 'स्पेस एंटरटेनमेंट एंटरप्राइझ' ही कंपनी 2024 पर्यंत अंतराळात जगातील पहिला फिल्म स्टुडिओ लॉन्च करणार आहे.
Tom Cruise's Space Film: 'स्पेस एंटरटेनमेंट एंटरप्राइझ' (S.E.E.) ही कंपनी 2024 पर्यंत अंतराळात जगातील पहिला फिल्म स्टुडिओ सुरू करण्याची योजना आखत आहे. 'स्पेस एंटरटेनमेंट एंटरप्राइझ'ने टॉम क्रूझच्या आगामी 'स्पेस' सिनेमाची निर्मिती केली आहे.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) मध्ये या दशकाच्या मध्यापर्यंत एक नवीन फिल्म स्टुडिओ आणि क्रीडा क्षेत्र असणार आहे. लंडनच्या स्पेस एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस (SEE) ने ISS साठी चित्रपट, टीव्ही स्पोर्ट्स आणि मनोरंजन प्रसारण मॉड्यूल तयार करण्याची योजना आखली आहे. हे 2024 मध्ये लॉन्च केले जाईल.
आयएसएससाठी हे मॉड्युल्स तयार करण्याची जबाबदारी 'अॅक्सिओम स्पेस' या कंपनीकडे देण्यात आली आहे. टॉम क्रूझच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरणदेखील इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर करण्यात येणार आहे.
'स्पेस एंटरटेनमेंट एंटरप्राइझ'च्या मते, कलाकार आणि निर्मात्यांना अंतराळ स्थानकावर लाईव्ह रेकॉर्ड करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. याशिवाय चित्रपटांचे शूटिंग, टेलिव्हिजन शो, म्युझिक अल्बम आणि स्पोर्ट्स इव्हेंट्सचे आयोजनही येथे केले जाऊ शकते.
टॉम क्रूझ करत आहे नासासोबत काम
टॉम क्रूझ अंतराळात चित्रपटाचं शूटिंग करणार असल्याच्या बातमीला नासानं यंदाच्या मे महिन्यातच दुजोरा दिला होता. या चित्रपटावर नासा टॉम क्रूझखेरीज इलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीसोबत काम करणार आहे. पृथ्वीच्या बाहेर इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर बनवला जाणारा हा पहिला चित्रपट ठरणार आहे. डोम लीमेन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाबाबत अद्याप इतर काही तपशील सांगण्यात आलेला नाही.
संबंधित बातम्या
Why I Killed Gandhi या चित्रपटावर बंदी आणावी, मौलाना आझाद विचार मंचने केली मागणी
Shahrukh Khan : किंग खानचं कमबॅक, 'पठाण'सह 'या' चित्रपटांच्या शूटिंगलाही करणार सुरुवात
Bigg Boss 15 Finale : पाचही स्पर्धक प्रबळ दावेदार, कोणाच्या गळ्यात पडणार ‘बिग बॉस 15’च्या विजेतेपदाची माळ?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha