Why I Killed Gandhi या चित्रपटावर बंदी आणावी, मौलाना आझाद विचार मंचने केली मागणी
Why I Killed Gandhi : मौलाना आझाद विचार मंचने 'व्हाय आय किल्ड गांधी' या सिनेमावर बंदी आणावी, अशी मागणी केली आहे.
Why I Killed Gandhi : 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटावर बंदी घाला, अशी मागणी 'मौलाना आजाद विचार मंच'ने केली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंत्रालयाशेजारील गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून 'मौलाना आजाद विचार मंच'च्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करण्यात आल्याचं सांगत या सिनेमावर बंदी आणावी, अशी मागणी मौलाना आझाद विचार मंचने केली आहे.
अशोककुमार त्यागी दिग्दर्शित 'व्हाय आय किल्ड गांधी' हा चित्रपट आज (30 जानेवारी) ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारलेले डॉ.अमोल कोल्हे म्हणाले, महात्मा गांधी यांच्या खुनाचे आपण कधीही समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही हे मी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र या भूमिकेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्याप्रति दिलगिरी व्यक्त करतो. शरद पवारांनी मात्र व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा समोर करून डॉ. अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचं समर्थन केलं.
वाद नेमका काय?
अमोल कोल्हे यांनी 2017 साली चित्रीकरण झालेल्या WHY I KILLED GANDHI या चित्रपटात नथुराम गोडसेंची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट आता लाईमलाईट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आणि यातील महात्मा गांधींना मारणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका अमोल कोल्हे यांनी साकारल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
संबंधित बातम्या
Amol Kolhe : 'नथुराम'ची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे गांधींच्या चरणी; आत्मक्लेश करत व्यक्त केली दिलगिरी
Bigg Boss 15 Finale : पाचही स्पर्धक प्रबळ दावेदार, कोणाच्या गळ्यात पडणार ‘बिग बॉस 15’च्या विजेतेपदाची माळ?
Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर कोरोनामुक्त; दिदींच्या उत्तम आरोग्यासाठी आरोग्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha