एक्स्प्लोर
आमीर खानच्या घरी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल (शुक्रवार) रात्री उशिरा अभिनेता आमीर खानची भेट घेतली. या भेटीमागचं नेमकं कारण अद्याप कळलं नाही.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल (शुक्रवार) रात्री उशिरा अभिनेता आमीर खानची भेट घेतली. या भेटीमागचं नेमकं कारण अद्याप कळलं नाही.
मात्र, आमीर खान आणि किरण रावला स्वाईन फ्लू झाल्यानं त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस आमीरच्या घरी गेले असल्याची शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची पत्नीदेखली होती. आमीरच्या घरीच जेवण करून मुख्यमंत्री रात्री दीड वाजता तिथून निघाले. दरम्यान, यावेळी तिथं नेमकी काय चर्चा झाली यााबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, आमीर खानच्या पानी फाऊंडेशननं वॉटर कप स्पर्धा घेतली होती. त्यावेळी या कार्यक्रमाला खुद्द मुख्यमंत्री हजर होते. पण स्वाईन फ्लूमुळे त्या कार्यक्रमाला आमीरला उपस्थित राहता आलं नव्हतं. तेव्हा या कार्यक्रमाला ऐनवेळी शाहरुखनं उपस्थिती लावली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement