Kangana Ranaut : Kangana Ranaut : कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिला जवानावर कारवाई, निलंबन नाही पण...
Kangana Ranaut : कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर एका महिला जवानाने कानशिलात लगावली होती. आता त्या महिला जवानावर कारवाई करण्यात आली आहे.
Kangana Ranaut : खासदार म्हणून निवडून येताच अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही दिल्लीच्या दिशेने रवाना झाली. पण या प्रवसात कंगनासोबत जो प्रकार घडला त्यानंतर संपूर्ण देशभरात एकच चर्चा सुरु झाली. चंदीगड विमानतळावर कंगनाला एका सीआयएसएफ जवानाने कानशिलात लगावली. त्यावर अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला होता.
कुलविंदर कौर असं या महिलेचं नाव आहे. त्याचवेळी सीआयएसएफकडून या महिला जवानावर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. आता या महिला जवानावार कारवाई करण्यात आली असून तिची रवानगी थेट बंगळुरुला केली आहे. जेव्हा हा सगळा प्रकार झाला तेव्हा त्या जवानावर निलंबानाची कारवाई होणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण आता निलंबनाची कारवाई करण्यात येणार नसून त्या जवानाची बदली करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कंगनाच्या राजकीय सल्लागारांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदिगड विमानतळावर हा सगळा प्रकार घडला. सीआयएफएफच्या महिला जवानाने कंगनाच्या कानशिलात लगावली. कंगनासोबत गैरवर्तवणूक करणाऱ्या महिला सीआयएसएफ जवानावर कारवाई करावी. शेतकरी आंदोलनावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सीआयएसएफ महिला जवान कंगनावर नाराज होती. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा निवडणुकीत कंगनाने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर कंगना दिल्लीला रवाना झाली. याच दरम्यान चंदिगड विमानतळावर तिच्या कानशिलात लगावली असल्याचे वृत्त समोर आले. कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिल्लीला जात असल्याचे सांगितले.
कोण आहे कुलविंदर कौर?
समोर आलेल्या वृत्तानुसार, कुलविंदर कौरची कौटुंबिक पार्श्वभूमी ही शेतकरी कुटुंबाची आहे. कुलविंदर कौरही 2009 मध्ये सीआयएसएफच्या सेवेत दाखल झाली. कुलविंदरचा पतीदेखील चंदिगड विमानतळावर कार्यरत आहे. कंगनाला कानशिलात लगावल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर कुलविंदरला सीआयएसएफमधून निलंबित करण्यात आले आहे. त्याशिवाय, तिच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे.
कुलविंदरचा सीआयएसएफमधील सेवेतील रेकोर्ड स्वच्छ असून तिच्याविरोधात कोणतीही तक्रार, दोषारोप नाहीत. कुलविंदर कौर ही मूळची पंजाबमधील सुलतानपूर लोधी येथील रहिवासी आहे. कुलविंदरही पती आणि मुलांसह मोहालीत वास्तव्य करते. कुलविंदरचा भाऊ हा शेतकरी नेता आहे.
दरम्यान या प्रकारानंतर बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी देखील या घटनेचा निषेध केला होता. जे कलाकार एरवी कंगनाच्या विरोधात असतात, त्या कलाकारांनी देखील कंगनाची बाजू घेत या घटनेचा तीव्र निषेध केला. पण काही कलाकरांनी हिंसेचा जरी निषेध केला असला, तरी तेव्हा कंगनाने ज्या पद्धतीने या प्ररकरणावर भाष्य केलं, त्याचा निषेधच केला.