Cinemas In Delhi : उद्योगांप्रमाणेच सिनेमागृहे 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी; मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी
Cinemas In Delhi : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दिल्ली सरकारने सिनेमागृहे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Cinemas In Delhi : ओमायक्रॉनच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील चित्रपटगृहे बंद करण्याच्या दिल्ली सरकारच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे भारतीय सिनेसृष्टीचे मोठे नुकसान होणार असून मार्च 2020 पासून भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उद्योग आणि इतर संस्थाप्रमाणेच चित्रपटसृष्टीलाही वागणूक द्यावी आणि दिल्लीतील सिनेमागृहे 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरू ठेवावी अशी मागणी मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने दिल्ली सरकारकडे केली आहे.
दिल्ली सरकारच्या सिनेमागृहे बंद करण्याच्या निर्णयावर भारतीय मल्टिप्लेक्स असोसिएशनचे अध्यक्ष कमल ग्यानचंदानी म्हणाले,"दिल्ली सरकारला आम्ही आवाहन करू की, प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करण्याआधी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहेत. तसेच 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सिनेमागृहे सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी".
Delhi Cinemas shut down - MAI statement https://t.co/ZbRXy80U49
— Kamal Gianchandani (@kamalgianc) December 28, 2021
'जर्सी' सिनेमालादेखील कोरोनाचा फटका
शाहिद कपूरचा आगामी 'जर्सी' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता त्याची रिलीज डेट 31 डिसेंबर पुढे ढकलण्यात आली आहे. शाहिद कपूरचा हा सिनेमा 31 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय होऊ शकत असल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. सिनेमा नेमका कधी प्रदर्शित होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संबंधित बातम्या
Jersey Movie Posponed : 'जर्सी' सिनेमाला कोरोनाचा फटका; रिलीज डेट ढकलली पुढे
January 2022 Films Calender : नवीन वर्षाची सुरुवात फिल्मी, वर्षाच्या सुरुवातीला 'हे' सिनेमे होणार प्रदर्शित
Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा' शोमध्ये RRR चित्रपटाचा धमाका; जाणून घ्या आरआरआरचा अर्थ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha