Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा' शोमध्ये RRR चित्रपटाचा धमाका; जाणून घ्या आरआरआरचा अर्थ
RRR Star Cast On Kapil Sharma Show : कपिल शर्मा कार्यक्रमाच्या आगामी भागात आरआरआर सिनेमाची टीम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
RRR Star Cast On Kapil Sharma Show : एसएस राजामौलींचा बहुचर्चित आरआरआर (RRR) सिनेमा 7 जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या राजामौली सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान आलिया भट्ट (Alia Bhatt), राम चरण (Ram Charan), एनटीआर (NTR), आणि राजामौली (Rajamouli) 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिसणार आहेत.
View this post on Instagram
'द कपिल शर्मा' कार्यक्रमात कपिल शर्माने कलाकारांना अनेक विनोदी प्रश्न विचारले आहे. लवकरच हा भाग प्रसारित केला जाणार आहे. सध्या सोशल मीडियावर प्रोमो व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये कपिल एनटीआर ज्युनिअरला विचारतो, "एअरपोर्टवर फक्त एनटीआर बोलून काम पूर्ण होते की आरटीपीसीआर रिपोर्टदेखील दाखवावा लागतो". कपिलच्या या अद्भुत विनोदबुद्धीवर सर्वच हसायला लागतात. कपिल शर्माने राजामौलीला सिनेमाच्या शीर्षकाबद्दलदेखील विचारले. कपिलने विचारले,"आरआरआर हे शीर्षक का ठेवले?, दुसरे कोणतेही शीर्षक मनात आले नाही का? आरआरआर म्हणजे रुपया रुपया रुपया असं आहे का?".
View this post on Instagram
7 जानेवारी 2022 रोजी 'आरआरआर' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आरआरआर चित्रपटात अजय देवगण, आलिया भट्ट, ज्यूनियर एनटीआर आणि राम चरण या कालाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. एसएस राजामौली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा जवळपास 10 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. आरआरआर चित्रपटातील 'नाचो नाचो' आणि 'जननी' या गाण्यांना सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
संबंधित बातम्या
83 Box Office Collection : '83' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केली कोटींची कमाई, चार दिवसांत कमावले 54.29 कोटी
January 2022 Films Calender : नवीन वर्षाची सुरुवात फिल्मी, वर्षाच्या सुरुवातीला 'हे' सिनेमे होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha