एक्स्प्लोर
चिरंजीवीच्या सिनेमात आठ मिनिटांच्या सीनसाठी तब्बल 54 कोटींचा खर्च
एका अॅक्शन सिनेमातून समोर येण्यासाठी चिरंजीवी सज्ज आहे. दक्षिणेतील हा सुपरस्टार आपल्याला ‘सये रा नरसिम्हा रेड्डी’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
मुंबई : दक्षिणेतील सुपरस्टार चिरंजीवी लवकरच एका अॅक्शन सिनेमातून समोर येणार आहे. ‘सये रा नरसिम्हा रेड्डी’ या सिनेमात तो झळकणार आहे. रिलीजपूर्वीच हा सिनेमा बिग बजेटमुळे चर्चेत आला आहे.
या सिनेमात एक वॉर सीन दाखवला जाणार आहे, जो शुट करण्यासाठी निर्मात्यांनी 54 कोटी रुपये खर्च केले. विशेष म्हणजे हा सीन फक्त आठ मिनिटांचा आहे.
या सिनेमातील आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे या सिनेमाचा निर्माता चिरंजीवीचा मुलगा रामचरण तेजा हा आहे. वडिलांचा सिनेमा हिट करण्यासाठी तो कितीही रक्कम खर्च करण्यास तयार आहे.
सिनेमाचं दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी करत असून एकूण बजेट 200 कोटी रुपये आहे. यापैकी 54 कोटी रुपये फक्त आठ मिनिटांच्या सीनसाठीच खर्च झाले आहेत.
सिनेमाची संपूर्ण टीम सध्या जॉर्जियामध्ये एक युद्धाचा सीन शुट करत आहे. हा सीन सिनेमाचा क्लायमॅक्स म्हणून दाखवला जाणार असल्याचं बोललं जात आहे, जो आठ मिनिटांचा असेल. या सीनमध्ये जे तंत्र वापरलं आहे, त्याचा खर्च 54 कोटींचा आहे.
‘सये रा नरसिम्हा रेड्डी’च्या शुटिंगसाठी हैदराबादहून जवळपास 150 जणांची टीम जॉर्जियाला गेली आहे. हजारो कॉश्च्युम सोबत नेले आहेत. 600 स्थानिक लोकांनाही जॉर्जियात हायर करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अर्थ बजेटचा 2025
भारत
भारत
अर्थ बजेटचा 2025
Advertisement