एक्स्प्लोर

Dilip Prabhavalkar: 'बीवायपी, व्हीआयपी आणि मी' पुस्तकाचे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन; अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी विजय पाध्येंची घेतली मुलाखत!

उद्वेली प्रकाशनच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

Dilip Prabhavalkar: मागील 63 वर्षांपासून जाहिरात क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या बी. वाय. पाध्ये पब्लिसिटीचे सर्वेसर्वा विजय पाध्ये उर्फ बाबा यांनी लिहिलेल्या 'बीवायपी, व्हीआयपी आणि मी' या पुस्तकाचे प्रकाशन एका दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. दादरच्या शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये जाहिरात, अभिनय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत 'बीवायपी, व्हीआयपी आणि मी'चे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत जयश्री खाडीलकर पांडे, अशोक समेळ, अजित भुरे, भरत दाभोळकर आणि विवेक मेहेत्रेही मंचावर हजर होते. त्यासोबतच प्रेक्षागृहात विजय पाध्ये यांचे बंधू श्रीराम, दिलीप, प्रसिद्ध अभिनेते संजय मोने, अतुल परचुरे, प्रसाद कांबळी, उदय धुरत, दिलीप जाधव, विजय गोखले, अनुराधा राजाध्यक्ष, सुधीर जोगळेकर, अनिल हर्डीकर, संजीव लाटकर, योगिता प्रभू, चंद्रकांत राऊत, अक्षर शेडगे, मनसेचे नितीन सरदेसाई, जयेंद्र साळगांवकर, रामदास पाध्ये, सत्यजीत पाध्ये अश्या अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभली होती. उद्वेली प्रकाशनच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

'बीवायपी, व्हीआयपी आणि मी'चा प्रकाशन सोहळा हा जाहिरात क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या विजय पाध्ये नामक यशस्वी उद्योजकाचा जणू कौतुक सोहळाच ठरला. उपस्थित सर्वच मान्यवरांनी विजय पाध्ये यांच्यावर स्तुतीसुमने उधळत 'बीवायपी, व्हीआयपी आणि मी' या पुस्तकाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. दिलीप प्रभावळकर यांनी मुलाखत घेत विजय पाध्ये यांचे अंतरंग उलगडण्याचा केलेला प्रयत्न उपस्थितांची दाद मिळवणारा ठरला. यावेळी प्रभावळकर म्हणाले की, जाहिरात क्षेत्रात यशाच्या शिखरावर विराजमान होऊनही माणुसकीचा धर्म न विसरलेल्या विजय पाध्ये यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे. माझा खूप जुना मित्र असलेल्या विजयचे 'बीवायपी, व्हीआयपी आणि मी' हे पुस्तक यशस्वी जीवनाचा मंत्र सांगणारे आहे. मितभाषी असलेला विजय हा खरा जगमित्र आणि अजातशत्रू आहे. 'बीवायपी, व्हीआयपी आणि मी' या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी खास पुण्याहून इथे आलो. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केलेले विजयचे अनेक मित्र आहेत. या पुस्तकात त्या सर्वांचे किस्से आहेत. विजयचा जनसंपर्क अफाट असून, त्यातूनच त्याने या पुस्तकाचे लिखाण केले आहे. जाहिरात क्षेत्रातील व्यवसाय कशाप्रकारे सचोटीने करायला हवा हे विजय पाध्ये यांनी मराठी माणसाला दाखवून दिले आहे. त्याच जोडीला विविध क्षेत्रांतील माणसे कशी जोडायची हे देखील विजयने दाखवून दिल्याचे प्रभावळकर म्हणाले.

या सोहळ्यात प्रभावळकरांनी घेतलेल्या मुलाखतीत विजय पाध्ये म्हणाले की, मृदू स्वभाव ही दादांची शिकवण तर आहेच, पण आपला स्वभावच मृदू आहे. माणसे जोडण्यासाठी समोरच्याचे ऐकायला हवे, वाद घालून प्रश्न सुटत नाहीत. व्यवसायात कित्येकदा तडजोडही करावी लागली. नेहमी समोरच्या व्यक्तीचा विचार करत असल्याने तडजोडीचा कधीच त्रास झाला नाही. समोरच्याचा इगो जपला, तर तो आपल्या प्रेमात पडतो. तांबे आरोग्य भुवनच्या बापू तांबेंनी व्यवसायात संयम शिकवला. दादांकडून खरे बोलायला, मावशीकडून व्यवहार सांभाळायला, मनोहर जोशींकडून वेळ पाळायला आणि विद्यालंकार क्लासेसच्या देशपांडे यांच्याकडून फायलींगसोबतच वेळेचे नियोजन करायला शिकलो. नंदी ब्रँड अगरबत्तीने जेव्हा बीवायपीला एक नवी ओळख मिळवून दिली, तेव्हा अमिन सयानींसारख्या दिग्गजांनीही कौतुक केले होते. या सर्व गोष्टीं सांगताना जाहिरातींमधील काही गिमिक्सही विजय पाध्ये यांनी उघड केली. जीवलग मित्र अभिनेते विनय आपटे यांच्यावर संकट कोसळल्यावर आपल्या संतापाचा विस्फोटही झाल्याचा किस्साही विजय पाध्ये यांनी सांगितला. राहून गेलेल्या गोष्टींमध्ये स्विमिंग कधीच केले नसून कधीच भपकेदार कपडे घातले नसल्याचे सांगितले.

विजय यांनी 26 जानेवारी 2018 रोजी या पुस्तकाचे लेखन सुरू केले. ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडीलकर पांडे म्हणाल्या की, पाध्ये यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे एक ग्रंथच आहे. त्यांना मिळालेले यश हे त्यांचे वडील दादांनी त्यांच्यावर केलेल्या संस्काराचे यश असल्याचेही खाडीलकर म्हणाल्या. अशोक समेळ आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, विजय यांनी लिहिलेले पुस्तक जगण्याचा फॅार्म्युला सांगणारे आहे. यासोबतच हे पुस्तक माणुसकीचा धर्म जपणाऱ्या व्यक्तींच्या ऐश्वर्याचे दर्शन घडवणारे असल्याचे अशोक समेळ म्हणाले. अॅडमॅन भरत दाभोळकर यांनी शाब्दिक फटकेबाजी करत उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. ते म्हणाले की, बी. वाय. पाध्ये ही एकत्र कुटुंबावर चालणारी संस्था आहे. या कुटुंबाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. हे केवळ पुस्तक नसून एक एनसायक्लोपीडिया किंवा डिक्शनरी असल्याचे मतही दाभोळकर यांनी व्यक्त केले. अजित भुरे यांनी दिवंगत अभिनेते विनय आपटेंच्या आठवणीना उजाळा देताच सभागृहातील वातावरण काहीसे भावूक झाले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले. आभार प्रदर्शनाचे काम बागेश्री पाध्ये पंडित यांनी केले. रुपये 650 मूल्य असलेले 'बीवायपी, व्हीआयपी आणि मी' प्रत्येक मराठी माणसाने एकदा वाचायलाच हवे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Amey Wagh, Sumeet Raghvan : अमेय वाघ अन् सुमीत राघवनचा सोशल मीडिया वॉर; अमेय म्हणाला 'राघू' तर, सुमीत म्हणतोय 'सर्कशीतला वाघ'!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur News: राज ठाकरेंच्या नेत्याने पंढरपूरजवळ बांधलं मुंबईच्या थाटाला लाजवणारं हॉटेल, पाहा PHOTO
राज ठाकरेंच्या नेत्याने पंढरपूरजवळ बांधलं मुंबईच्या थाटाला लाजवणारं हॉटेल, पाहा PHOTO
पंकजा मुंडे अन् सुरेश धस एकाच मंचावर; मुख्यमंत्री फडणवीसांकडून बीडमध्ये विकासकामांचा शुभारंभ
पंकजा मुंडे अन् सुरेश धस एकाच मंचावर; मुख्यमंत्री फडणवीसांकडून बीडमध्ये विकासकामांचा शुभारंभ
ATM मधून पैसे काढणं महागणार? आरबीआय मोठ्या निर्णयाच्या तयारीत, बँक खातेदारांना फटका बसणार
आता एटीएममधून पैसे काढणंही महागणार? आरबीआय मोठ्या निर्णयाच्या तयारीत, खातेदारांना आणखी एक धक्का
Eknath Khadse : CM फडणवीसांच्या भेटीनंतर नाथाभाऊंचा भाजप प्रवेश होणार? एकनाथ खडसे म्हणाले; राष्ट्रवादीत...
CM फडणवीसांच्या भेटीनंतर नाथाभाऊंचा भाजप प्रवेश होणार? एकनाथ खडसे म्हणाले; राष्ट्रवादीत...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Amrutsnan : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाकुंभमेळ्यात अमृतस्नानABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 05 February 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSanjay Raut Delhi : महाकुंभमधील घटनेवर मला बोलू दिलं नाही,माईक बंद केला..-राऊतSuresh Dhas On Santosh Deshmukh : आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur News: राज ठाकरेंच्या नेत्याने पंढरपूरजवळ बांधलं मुंबईच्या थाटाला लाजवणारं हॉटेल, पाहा PHOTO
राज ठाकरेंच्या नेत्याने पंढरपूरजवळ बांधलं मुंबईच्या थाटाला लाजवणारं हॉटेल, पाहा PHOTO
पंकजा मुंडे अन् सुरेश धस एकाच मंचावर; मुख्यमंत्री फडणवीसांकडून बीडमध्ये विकासकामांचा शुभारंभ
पंकजा मुंडे अन् सुरेश धस एकाच मंचावर; मुख्यमंत्री फडणवीसांकडून बीडमध्ये विकासकामांचा शुभारंभ
ATM मधून पैसे काढणं महागणार? आरबीआय मोठ्या निर्णयाच्या तयारीत, बँक खातेदारांना फटका बसणार
आता एटीएममधून पैसे काढणंही महागणार? आरबीआय मोठ्या निर्णयाच्या तयारीत, खातेदारांना आणखी एक धक्का
Eknath Khadse : CM फडणवीसांच्या भेटीनंतर नाथाभाऊंचा भाजप प्रवेश होणार? एकनाथ खडसे म्हणाले; राष्ट्रवादीत...
CM फडणवीसांच्या भेटीनंतर नाथाभाऊंचा भाजप प्रवेश होणार? एकनाथ खडसे म्हणाले; राष्ट्रवादीत...
Pune Crime News: दहशत पसरवण्यासाठी 50 वाहनांची तोडफोड; पोलिसांनी आरोपींना घडवली चांगलीच अद्दल, त्याच भागात नेलं अन्...
दहशत पसरवण्यासाठी 50 वाहनांची तोडफोड; पोलिसांनी आरोपींना घडवली चांगलीच अद्दल, त्याच भागात नेलं अन्...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प गाझापट्टी ताब्यात घेणार म्हणताच अवघ्या जगाला शाॅक, हमासची सुद्धा प्रतिक्रिया आली!
डोनाल्ड ट्रम्प गाझापट्टी ताब्यात घेणार म्हणताच अवघ्या जगाला शाॅक, हमासची सुद्धा प्रतिक्रिया आली!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडात पण धनंजय मुंडे रुग्णालयात; शस्त्रक्रियेनंतर 5 दिवस आराम करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडात पण धनंजय मुंडे रुग्णालयात; शस्त्रक्रियेनंतर 5 दिवस आराम करणार
Pune News: 20 दिवसांपूर्वी साखरपुडा, 30 व्या वर्षी गळ्याला दोरी, तुकाराम महाराजांच्या वंशजाने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?
20 दिवसांपूर्वी साखरपुडा, 30 व्या वर्षी गळ्याला दोरी, तुकाराम महाराजांच्या वंशजाने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?
Embed widget