(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Brahmastra Box Office Collection: बॉक्स ऑफिसवरही दिसतेय ‘ब्रह्मास्त्र’ची जादू! पटकावला जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान
Brahmastra Box Office Collection: ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji) याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
Brahmastra Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने रिलीजनंतरच्या अवघ्या 25 दिवसांत 425 कोटींचा व्यवसाय केला आहे. मणिरत्नम यांचा 'PS-1' चित्रपट रिलीज झाल्यानंतर आता बॉक्स ऑफिसवर ‘ब्रह्मास्त्र’चा वेग मंदावला असला, तरी अयान मुखर्जीच्या या चित्रपटाने विक्रम नोंदवला आहे. रणबीर-आलिया स्टारर या चित्रपटाने कन्नड रॉकिंग स्टार यशच्या पॅन इंडिया चित्रपट 'KGF 2'ला बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या बाबतीतही मागे टाकले आहे. यंदाच्या वर्षात जगभरातील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान ‘ब्रह्मास्त्र’ने पटकावला आहे.
‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji) याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. यंदाच्या वर्षात ‘ब्रह्मास्त्र’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. रिलीजच्या 25 दिवसानंतरही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू पाहायला मिळत आहे.
पाहा पोस्ट :
रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ केवळ भारतातच नाही, तर परदेशातही चांगली कमाई करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने 'KGF: Chapter 2'चा विक्रम देखील मोडीत काढला आहे. रिपोर्टनुसार, साऊथ स्टार यशची मुख्य भूमिका असलेल्या ‘KGF 2’ या चित्रपटाने अमेरिकेमध्ये जवळपास 7.41 दशलक्ष डॉलरचा व्यवसाय केला होता. तर, ब्रह्मास्त्रने KGF 2ला मागे टाकत अंदाजे 7.44 दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे. इतकेच नाही तर 'ब्रह्मास्त्र' हा परेदशातही बक्कळ कमाई करणारा 2022मधील सर्वात मोठा भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे तर, 410 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘ब्राह्मास्त्र’ चित्रपटाने 425 कोटींची कमाई केली आहे.
शिव आणि ईशाची कहाणी
अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा' हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. अस्त्रांची दुनिया दाखवणाऱ्या या चित्रपटात व्हीएफएक्सचा चांगला वापर करण्यात आला आहे, जो प्रेक्षकांना चित्रपटाकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरला. ‘ब्रह्मास्त्र’ हा एक साय-फाय चित्रपट आहे, ज्यात तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला गेला आहे. या चित्रपटाची कथा रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी साकारलेल्या शिव आणि ईशाभोवती फिरते. या चित्रपटात रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र झळकले आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खाननेही या चित्रपटात कॅमिओ केला आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :