(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Netflix: बॉयकॉट नेटफ्लिक्स होतंय ट्रेंड, नयनताराच्या चित्रपटाशी आहे कनेक्शन, नेमकं प्रकरण काय?
Annapoorani Movie: अन्नपूर्णी (Annapoorani) या चित्रपटामधील संवादामुळे नेटकरी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत.
Annapoorani Movie: नेटफ्लिक्स (netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध वेब सीरिज आणि चित्रपट रिलीज होत असतात. सध्या ट्विटरवर म्हणजेच X या प्लॅटफॉर्मवर बॉयकॉट नेटफ्लिक्स हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. नेटकरी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला बॉयकॉट करण्याची मागणी नेटकरी करत आहेत. अभिनेत्री नयनताराच्या अन्नपूर्णी (Annapoorani) या चित्रपटामधील संवादामुळे नेटकरी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत. बॉयकॉट नेटफ्लिक्स हा हॅशटॅग आणि नयनताराचा अन्नपूर्णी हा चित्रपट यामध्ये कनेक्शन काय आहे? हे नेमकं प्रकरण काय आहे? याबाबत जाणून घेऊयात...
'अन्नपूर्णी' चित्रपटातील संवादामुळे नेटफ्लिक्सला बॉयकॉट करण्याची मागणी
नयनताराचा अन्नपूर्णी हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. तेव्हापासून नेटफ्लिक्सचा बॉयकॉट सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. "राम मांसाहारी होता", असा संवाद अन्नपूर्णी या चित्रपटामध्ये घेण्यात आलाय. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा आरोप अनेकांनी चित्रपटाच्या टीमवर केला आहे. अशताच आता ट्विटरवर अनेकांनी ट्वीट शेअर करुन नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला बॉयकॉट करण्याची मागणी अनेक नेटकरी करत आहेत.
नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "नेटफ्लिक्स इंडिया आम्ही तुम्हाला कडक इशारा देत आहोत. तुमचा हा चित्रपट ताबडतोब काढून टाका अन्यथा कायदेशीर परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा." तर दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'राम, लक्ष्मण आणि सीता यांनी नवसात मांस खाल्ले होते, Netflix हे काय आहे? कलेच्या नावाखाली काय दाखवले जात आहे?'
We are strictly warning you @NetflixIndia to immediately withdraw this evil movie of yours or else be ready to face legal consequences and @BajrangDalOrg style action.@ZeeStudios_ pic.twitter.com/AVX9h4jHQ6
— Shriraj Nair (@snshriraj) January 9, 2024
"Ram-Lakshman-Sita used to eat meat during Vanvash"
— 𝗖𝗢𝗠𝗥𝗔𝗗𝗘 (@YourBuddy1129) January 10, 2024
This is what @NetflixIndia is showing in the name of art 😡#BoycottNetflix pic.twitter.com/D3FD7hkWhM
'अन्नपूर्णी' चित्रपटाच्या टीमच्या विरोधात एफआयआर दाखल
एका हिंदू संघटनेने जबलपूरमध्ये 'अन्नपूर्णी' या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट, निर्माता आणि दिग्दर्शकाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. अन्नपूर्णी चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत, ज्यात भगवान श्री राम यांच्याबद्दल अयोग्य टिप्पणी करून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचे या एफआयआरमध्ये सांगण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: