Nora Fatehi: रिजेक्शन निराशेनं खचली, रागाने लालेलाल झाली; बॉलिवूडमध्ये 'यामुळे' अपयशी ठरतात अभिनेत्री, नोरा फतेहीनं सांगितलं कारण
कॅनडातून भारतीय चित्रपट उद्योगात आलेल्या नोराला तिच्या डान्सिंग आणि अदाकारीमुळे लोकप्रीयतेच्या शिखरावर आणले. नुकत्याच झालेल्या मेलबर्नच्या इंडियन फेस्टीवलमध्ये ती बोलत होती.

Nora Fatehi: काही पूर्वीपासून बऱ्याच विदेशी अभिनेत्रींनी हिंदी सिनेसृष्टीत नशीब अजमावले आहे. यापैकी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच अभिनेत्री हिंदी सिनेसृष्टीत यशस्वी झाल्या आहेत. यात कतरिना कैफ हे अलीकडच्या काळातील यशस्वी अभिनेत्रीचे सर्वांत मोठे उदाहरण मानले जाते. पण, सध्या नोरा फतेहीने हिंदी सिनेप्रेमींना मोहिनी घातली आहे. अनेक वर्ष स्ट्रगल केल्यानंतर तिने आपल्या इंडस्ट्रीतल्या अनुभवावर नुकतेच सांगितले आहे. कॅनडातून भारतीय चित्रपट उद्योगात आलेल्या नोराला तिच्या डान्सिंग आणि अदाकारीमुळे लोकप्रीयतेच्या शिखरावर आणले. नुकत्याच झालेल्या मेलबर्नच्या इंडियन फेस्टीवलमध्ये ती बोलत होती.
मॉडेल्स पार्टी करायच्या तेंव्हा शिकली हिंदी
बरीच वर्षे स्ट्रगल केलेल्या नोराने आपल्या अनोख्या डान्सिंग स्टाइलच्या बळावर रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण, हे काम सोपे मुळीच नव्हते असे तिचे म्हणणे आहे. ती म्हणाली की, भारतीय सिनेसृष्टीत दाखल होणाऱ्या बऱ्याच विदेशी अभिनेत्री नीट हिंदी बोलता येऊ न शकल्याने अपयशी होतात. नॉर्मल बोलतानाही त्यांच्या भाषेच्या उच्चारांमुळे बरेच शब्द लोकांना समजत नाहीत. इथले प्रेक्षक अभिनेत्रींना भाषेवरून ओळखतात. त्यामुळे इतर मॉडेल्स जेव्हा पार्टी करायच्या तेव्हा आपण इंडस्ट्रीचा अभ्यास केल्याचेही नोरा म्हणाली.
रागाच्या भरात सेलफोन तोडला
अनेकदा बॉलिवूडच्या बाहेरून आलेल्या कलाकारांना रिजेक्शनचा सामना करावा लागतो. नोरा फतेहीही याला अपवाद नाही. ती म्हणाली, मला आठवतं की मी एकदा ऑडिशनसाठी गेले होते. यशराज फिल्मसची ऑडिशन होती. मी घोकून घोकून ओळी पाठ केल्या होत्या. ऑडिशन झाली. पण त्यांनी मला पुन्हा कॉल केला नाही. ती एवढी चांगली नाही. अशी प्रतिक्रीया त्यांच्याकडून आली होती. मी रागाच्या भरात माझा फोन तोडला होता... असं सांगत नोरानं तिच्या अनुभवाबद्दल सांगितिले.
नकारावर जास्त प्रतिक्रिया देल्या
निराशेचा प्रत्येकाचा क्षण असतो. नोरासाठी हा क्षण टर्निंग पॉईंटच ठरला. ती म्हणते,'प्रत्येकाची वेळ असते आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा सर्व दरवाजे उघडतात. पण जर मी माझ्यासाठी खुले नसलेले दरवाजे जबरदस्तीने लावत राहिलो तर ते मला मदत करणार नाही.”
नोरा म्हणाली की, मागे पाहताना समजले की मी नकारावर जास्त प्रतिक्रिया देत आहे, कारण ज्या प्रकल्पांसाठी मला नकार देण्यात आला होता ते सर्व चित्रपटगृहात चांगली कामगिरी करत नव्हते. त्या चित्रपटामुळे माझी अस्तित्वात नसलेली कारकीर्द उद्ध्वस्त होऊ शकते. म्हणून मी सोडून द्यायला शिकले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
