Bollywood Movies : '83' पासून 'The Hand Of God' पर्यंत बिग बजेट सिनेमे येत्या काही दिवसांत करणार प्रेक्षकांचे मनोरंजन
Bollywood Movies : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अनेक बिग बजेट सिनेमे येणार आहेत.
Bollywood Movies : येत्या काही दिवसांत '83' सारखे अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. त्यातील काही सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहेत तर काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. येत्या वर्षात अनेक सिनेमे धुमाकूळ घालणार आहेत.
अरण्यक (Aranyak) : रवीना टंडनने अरण्यक या वेब सीरिजच्या माध्यमातून पुनरागमन केले आहे. रवीनाने साकारलेल्या भूमिकेची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अरण्यक ही सीरिज 10 डिसेंबर रोजी नेटफ्लिकवर प्रदर्शित झाली होती. आशुतोष राणा, जाकिर हुसैन, मेघना मलिक या कलाकारांच्या या सिनेमात महत्तवाच्या भूमिका आहेत.
83 (in theatres) : रणवीर सिंहचा '83' सिनेमा 24 डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे कथानक 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खानने केले आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत. दीपिका या चित्रपटाची सहनिर्मातीदेखील आहे.
The Hand of God (Netflix) : पाओलो सोरेंटिनोचा हा एक उत्तम सिनेमा आहे. या सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत आहेत. सिनेमाचा ट्रेलर याआधीच प्रदर्शित झालेला असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.
Light The Night : 'लाइट द नाईट' ही नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली वेबसीरिज आहे. या सीरिजमध्ये एका महिलेचा मृतदेह जंगलात सापडला दिसून येतो.
संबंधित बातम्या
Merry Christmas : करीना कपूरपासून अनुष्का शर्मापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या नाताळच्या शुभेच्छा
Mahesh Babu : 2021 च्या मोस्ट हँडसम पुरुषांच्या यादीत महेश बाबू दहाव्या स्थानी
Virat Anushka Praises 83 : Ranveer Singh च्या '83' सिनेमावर विराट म्हणाला...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha