(Source: ECI/ABP News/ABP Majha)
OTT Movies : थिएटर गाजवलं, बॉक्स ऑफिसवर केली दणदणीत कमाई; आता ओटीटीवरही 'या' चित्रपटांची क्रेझ कायम
OTT Movies : सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्यापेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ओटीटीवर प्रेक्षक घरबसल्या विविध चित्रपट आणि वेबसीरिज पाहू शकतात.
OTT Movies : बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक चित्रपटांनी (Movies) बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करणारे हे चित्रपट ओटीटीवरदेखील रिलीज झाले आहेत. बॉक्स ऑफिस गाजवलेले हे चित्रपट प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहायला मिळत आहेत. या चित्रपटांची सिनेप्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे.
रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani)
कुठे पाहू शकता? प्राईम व्हिडीओ
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा रोमँटिक चित्रपट आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंह या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. प्राईम व्हिडीओवर प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतात. रॉकी आणि रानी हे दोन भिन्न कुटुंबातील व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडतात त्यानंतर पुढे काय होतं हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
पठाण (Pathaan)
कुठे पाहू शकता? प्राईम व्हिडीओ
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. आता हा चित्रपट प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. सिनेमागृहानंतर ओटीटीवरदेखील या चित्रपटाची क्रेझ कायम आहे.
डार्लिंग्स (Darlings)
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स
आलिया भट्ट आणि विजय वर्मा स्टारर डार्लिंग्स हा डार्क कॉमेडी असणारा चित्रपट आहे. या चित्रपटात पती-पत्नीवर भाष्य करण्यात आले आहे. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल.
जवान (Jawan)
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स
शाहरुख खान आणि नयनतारा स्टारर जवान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1100 कोटींची कमाई केली. हा सिनेमा प्रेक्षक नेटफ्लिक्सवर पाहू शकतात. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत.
आरआरआर (RRR)
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स
ज्युनिअर एन्टीआर आणि राम चरण यांचा आरआरआर हा एक क्लासिक चित्रपट आहे. या सिनमाने ऑस्कर पुरस्कारावरही आपलं नाव कोरलं आहे. तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर नेटफ्लिक्सवर तुम्ही पाहू शकता.
ब्रह्मास्त्र (Brahmastra)
कुठे पाहू शकता? डिज्नी प्लस हॉटस्टार
अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. शिवा या पात्राभोवती फिरणारा हा चित्रपट आहे. त्याच्याकडे एक स्पेशल पॉवर असते. हा चित्रपट प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
केजीएफ (KGF)
कुठे पाहू शकता? डिज्नी प्लस हॉटस्टार
सुपरस्टार यशच्या केजीएफ या चित्रपटातील धमाकेदार ट्विस्ट पाहताना तुमच्या अंगावर शहारे येतील. डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतात.
गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स
आलिया भट्ट स्टारर गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट चांगलाच गाजला. आलियाचा दमदार अभिनय आणि जबरदस्त डायलॉग असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल.
संबंधित बातम्या