(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dil Bechara Twitter Reactions | सुशांतच्या आठवणीत घरं बनली सिनेमागृहं, 'दिल बेचारा'ला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा शेवटचा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची अनेक चाहत्यांची इच्छा होती. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' शुक्रवारी (24 जुलै) संध्याकाळी रिलीज करण्यात आली. सुशांतचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतने या चित्रपटाची वाट पाहत होते. शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता डिस्ने हॉटस्टारवर हा सिनेमा रिलीज करण्यात आला. त्यानंतर अनेक चाहत्यांनी चित्रपट पाहून सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच आपल्या लाडका अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट पाहून चाहत्यांनी त्याच्या आठवणींना उजाळाही दिला. त्याचबरोबर सोशल मीडियावरही अनेक प्रतिक्रीया आणि भावनिक पोस्टचा जणू महापूरच आला होता.
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा शेवटचा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची अनेक चाहत्यांची इच्छा होती. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला. पण, ऐकतील ते फॅन्स कसले, अनेक चाहत्यांनी आपल्या घरीच होम थिएटर क्रिएट करून सुशांतला मोठ्या पडद्यावर पाहण्याची आपली इच्छा पूर्ण केली. सोशल मीडियावर सुशांतला श्रद्धांजली वाहणाऱ्या अनेक पोस्ट पाहायला मिळाल्या. हसता-खेळता सुशांत चाहत्यांना पुन्हा पाहायला मिळाला. पडद्यावरील कथानक पाहून अनेकांना सुशांतच्या रियल लाइफ स्टोरीची आठवण झाली. पाहूयात सुशांतच्या आठवणीत चाहत्यांनी केलेल्या सोशल मीडियावरील काही पोस्ट :
दरम्यान, सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' रिलीज झाला असून या चित्रपटाच मुख्य भूमिकेत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री संजना सांघी आहे. दोघांच्या केमेस्ट्रीची लोक खूप प्रशंसा करत आहेत. चित्रपटाची पटकथा एका कॅन्सर पीडित मुलीशी संबंधित आहे. जेव्हा ती कॉलेजमध्ये असते, तेव्हा तिला कॅन्सर होतो. अशातच तिला एक मुलगा भेटतो. त्यानंतर दोघेही आपल्या आयुष्यातील दुःखाचा सामना करताना आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात.
'दिल बेचारा' आज रिलीज होणार, सिनेमाच्या शेवटी सुशांतला अनोखी आदरांजली
सुशांतला अनोखी आदरांजली
मुकेश छाब्रा दिग्दर्शित या चित्रपटची सध्या जोरदार चर्चा आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट असल्यामुळे या सिनेमाकडे सिनेप्रेमी सहानुभूतीने पाहत आहेत. कारण सुशांत गेल्यानंतर या चित्रपटाची घोषणा झाली. त्याची तारीख जाहीर झाली. यापूर्वी अनेकदा त्याचं प्रदर्शन काही कारणाने पुढे ढकलण्यात आलं होतं. सुशांत गेल्यानंतर अनेक स्तरातून हळहळ व्यक्त झाली. कुणी शब्दातून व्यक्त झालं. तर कुणी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून. संगीतकार ए आर रेहमानही यात मागे नव्हता. ए. आर. रेहमानने नुकतंच एक गाणं बनवलं आहे. 'दिल बेचारा'च्या निमित्ताने त्याचं नुकतंच लोकार्पण करण्यात आलं. ते गाणं आता सिनेमाच्या एंड स्क्रोलला म्हणजे सिनेमाच्या शेवटी टायटल्स येतात त्यावेळी लावलं जाणार आहे. सुशांतला ती एकप्रकारे आदरांजली असेल.
महत्त्वाच्या बातम्या :
सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सलमान खानची चौकशी होणार?आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करेन! सुशांतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट
काय सांगता हुबेहुब सुशांत सिंह राजपूत?; सोशल मीडियावर 'या' तरूणाचे फोटो व्हायरल