एक्स्प्लोर

उद्योगपतीशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला, त्यानंतर आमदाराच्या घरात गृहप्रवेश, वर्षानुवर्ष इंडस्ट्रीतून गायब, पण तरीही कोट्यवधींची मालकिण, 'ही' अभिनेत्री कोण?

बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी ही अभिनेत्री कित्येक वर्ष रुपेरी पडद्यापसून लांब आहे. पण तरीही तिच्या नेटवर्थबाबात (Net Worth) बोलायचं झालं तर, ती आज कोट्यवधींची मालकीण आहे. 

Actress Who Changed Her Religion For Wedding: बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी आपला धर्म बदलल्याचं पाहिलं आहे. अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी इस्लाम धर्म स्विकारला आणि हेमा मालिनी यांचा हात धरला. निर्गिस दत्त (Nargis Dutt) यांनी प्रेमाखातर आपला धर्म बदलला होता. नर्गिस मुस्लिम होत्या, पण सुनील दत्त (Sunil Dutt) यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्यांनी हिंदू धर्म स्विकारला आणि स्वतःचं नाव बदलून निर्मला दत्त असं ठेवलं. एक-दोन नव्हे, अशी अनेक उदाहरणं बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतील. पण तुम्हाला माहीत आहे का? एक अशी अभिनेत्री जिनं आपल्या पहिल्या चित्रपटापासूनच इंडस्ट्रीमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं. सलमान खान, अजय देवगण अशा सुपरस्टार्ससोबत स्क्रिन शेअर केली, मात्र 4 वर्षांतच तिनं रुपेरी पडद्यापासून फारकत घेतली. 

विसाव्या शतकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये गणना होणारी आणि कित्येक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारी अभिनेत्री म्हणजे, आयेशा टाकिया (Ayesha Takia). अवघ्या काही दिवसांतच आयशानं बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलेलं. पण ऐन यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यानंतर आयशानं आपला धर्म बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आमदाराच्या घरात सून म्हणून अभिनेत्रीनं गृहप्रवेश केला. पण त्यानंतर मात्र आयशा रुपेरी पडद्यापासून, बॉलिवूडपासून काहीशी दुरावली गेली. असं असलं तरीदेखील नेटवर्थमध्ये ती भल्या भल्या टॉपच्या अभिनेत्रींना मागे टाकते. 

अवघ्या चार वर्षांची कारकीर्द, अन् सुपरस्टार्ससोबतचे ब्लॉकबस्टर चित्रपट... 

कमनिय बांधा, सुंदर हास्य आणि सौंदर्याची तर बातच और... अशी बॉलिवूड बाला आयशा टाकीया अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत. 'टारझन गर्ल' आयेशा टाकियाची 2004 मध्ये सुरू झालेली कारकीर्द 2009 पर्यंत अधोगतीला गेली. याला कारण ठरलं तिचं प्रेम. प्रेमासाठी आयशानं आपल्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना धर्म बदलण्याचा निर्णय घेतला. 

आयशा टाकीयानं 2009 मध्ये बॉयफ्रेंड फरहान आजमीसोबत आपली लग्नगाठ बांधली. त्यानंतर मुस्लिम धर्म स्विकारुन तिनं आपलं नावंही बदललं. 'टार्जन: द वंडर कार', 'वॉन्टेड' , 'पाठशाला' आणि 'मोड', 'ये दिल मांगे मोर' 'कॅश', 'शादी से पहले', 'शादी नंबर वन' आणि 'संडे' यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर आयशानं बॉलिवूडमध्ये आपला दबदबा तयार केला होता. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत बोलताना आयशानं खुलासा केला की, आता ती बॉलिवूडमध्ये पुन्हा येणार नाही. कारण ती आपल्या लाईफमध्ये खूश आहे. 

37 वर्षांच्या आयशा टाकिया रुपेरी पडद्यापासून दूर आहे, पण ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. काही दिवसांपूर्वी आपल्या ओठांच्या सर्जरीमुळे ती खूपच ट्रोल झाली होती. 

रुपेरी पडद्यापासून दुरावली आयेशा... 

ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. बॉलिवूडपासून दुरावलेल्या अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव सामील आहे. आशियाचं नाव अशा अभिनेत्रींमध्ये गणलं जातं ज्या स्टारडम, प्रसिद्धी आणि ग्लॅमरच्या झगमगाटात आल्या पण जास्त काळ टिकू शकल्या नाहीत.

यासोबतच तिनं आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेऊन सर्वांना चकीत केलं. आयशा टाकियाबद्दल असं म्हटलं जातं की, तिच्या फ्लॉप करिअरच्या पार्श्वभूमीवर तिनं तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला आणि समाजवादी पार्टी (एसपी) नेते आणि आमदार अबू असीम आझमी यांची सून बनली.

आयशानं 2009 मध्ये लग्न केलं. आता आयशा एका गोंडस मुलाची आई आहे. लग्नानंतर आयशानं चित्रपटात काम करणं बंद केलं. आयशाचा नवरा फरहान हा बिझनेसमन आहे. तो हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाशीही संबंधित आहे. याशिवाय फरहानला राजकारणातही खूप रस आहे.

आयशाचे सासरे म्हणजे, अबू असीम आझमी. यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांची गणणा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांमध्ये केली जाते. ते मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात कार्यरत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अबू आझमींची संपत्ती 142 कोटी आहे. तर त्यांचा मुलगा फरहानची एकूण संपत्ती 72 कोटींहून अधिक आहे. 

आता जर आयेशाचे सासरे अबू असीम आझमी यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांची गणना महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांमध्ये केली जाते. ते मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा जागेवर कार्यरत आहेत. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर त्यांच्याकडे 142 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांचा मुलगा फरहानची एकूण संपत्ती 72 कोटींहून अधिक आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

तिचं सौंदर्यचं ठरलं तिचा शत्रू, चेहरा पाहूनच नकार द्यायचे दिग्दर्शक; पण मग एक दिवस होकार आला अन् बॉलिवूड डेब्यू कन्फर्म झाला...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
Sushma Andhare: अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
Weather Update: कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
Maharashtra Vidhan Sabha adhiveshan: नव्या आमदारांना रविवारीही सुट्टी नाही, दोन दिवसांत शपथविधी, 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड
नव्या आमदारांना रविवारीही सुट्टी नाही, दोन दिवसांत शपथविधी, 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Congress Rajya Sabha : राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकाखाली 500 च्या नोटा Special ReportMira Road Special Report : मीरा रोडमध्ये वृद्ध महिलेला ठेवलं डांबून, ज्येष्ठांची सुरक्षा वाऱ्यावर?Allu Arjun Pushpa 2 Movieपुष्पा 2 सिनेमाची पहिल्याच दिवशी 'पुष्पा2' ने कमावले 175 कोटीSpecial ReportABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स :  07 Dec 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
Sushma Andhare: अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
Weather Update: कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
Maharashtra Vidhan Sabha adhiveshan: नव्या आमदारांना रविवारीही सुट्टी नाही, दोन दिवसांत शपथविधी, 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड
नव्या आमदारांना रविवारीही सुट्टी नाही, दोन दिवसांत शपथविधी, 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड
Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
Mumbai Crime : नव्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
व्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
Embed widget