(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Taraja Ramsess Death: 'ब्लॅक पँथर'फेम तराजा रामसेसचा भीषण अपघातात मृत्यू; अभिनेत्याच्या तीनही मुलांचा गेला जीव
Taraja Ramsess Death: 31 ऑक्टोबर रोजी जॉर्जिया (Georgia) महामार्गावर झालेल्या अपघातात तराजा रामसेसचा मृत्यू झाला. या अपघातात त्याच्या तीन मुलांचा देखील मृत्यू झाला आहे.
Taraja Ramsess Death: 'ब्लॅक पँथर' (Black Panther) फेम स्टंटमॅन तराजा रामसेसचा (Taraja Ramsess) एका भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. 31 ऑक्टोबर रोजी जॉर्जिया (Georgia) महामार्गावर झालेल्या अपघातात तराजा रामसेसचा मृत्यू झाला. या अपघातात त्याच्या तीन मुलांचा देखील मृत्यू झाला आहे. तराजानं वयाच्या 41 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
जॉर्जिया येथे झाला भीषण अपघात
जॉर्जिया येथे झालेल्या या अपघातात 13 वर्षांची मुलगी सुंदरी रामसेस, 10 वर्षांचा मुलगा किसासी आणि नवजात मुलगी फुजिबो रामसेस यांचा मृत्यू झाला. एका रिपोर्टनुसार, हॅलोवीनच्या रात्री मुलांनी भरलेला पिकअप ट्रक रामसेस चालवत होता. तो ट्रक ट्रॅक्टरला धडकल्यानं ही दुर्घटना घडली.
तराजा रामसेसच्या आईवर कोसळला दु:खाचा डोंगर
तराजा रामसेस आणि त्याच्या दोन मुलींच्या मृत्यूनंतर तराजाची आई अयकीली रामसेसवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तराजाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईनं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे. अयकीलीनं पोस्टमध्ये लिहिलं, "माझा सुंदर, प्रेमळ, हुशार मुलगा तरजा,त्याची 13 वर्षांची मुलगी सुंदरी, 10 वर्षांचा मुलगा किसासी आणि 8 आठवड्यांची नवजात मुलगी फुजिबो यांचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला."
View this post on Instagram
तराजाच्या आईनं पोस्टमध्ये लिहिलं होतं की, "माझा 10 वर्षांचा नातू किससी, "सॉस द बॉस" हा लाइफ सपोर्टवर आहे." पण नंतर आणखी एक पोस्ट शेअर करुन तराजाच्या आईनं किससीच्या मृत्यूची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे. त्या पोस्टमध्ये अयकीनं लिहिलं, "किससी हा त्याच्या वडिलांकडे आणि बहिणीकडे गेला आहे."]
View this post on Instagram
'या' चित्रपटांमध्ये तराजा रामसेसनं केलं काम
तराजा रामसेस केवळ मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) मधील स्टंट मॅन म्हणून नाही तर Avengers: Endgame आणि Black Panther: Wakanda Forever सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठीही प्रसिद्ध होता. याशिवाय त्याने द सुसाईड स्क्वॉड, क्रीड III, द हंगर गेम्स: कॅचिंग फायर, एमेंसिपेशन आणि द हार्डर दे फॉल यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले. तराजा रामसेसच्या निधनानंतर हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.